शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
5
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
6
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
9
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
10
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
11
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
12
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
13
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
14
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
15
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
16
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
17
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
18
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
19
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
20
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षी भावाला आमच्या संघातून खेळवायचे

By admin | Updated: January 10, 2015 00:20 IST

शिवाजी तरुण मंडळाकडून खेळण्याची संधी मिळत नव्हती म्हणून नंदू तिवले यांनी स्थापन केलेल्या यंग बॉईज संघाकडून मी फुटबॉल खेळण्यास प्रारंभ केला


शिवाजी तरुण मंडळाकडून खेळण्याची संधी मिळत नव्हती म्हणून नंदू तिवले यांनी स्थापन केलेल्या यंग बॉईज संघाकडून मी फुटबॉल खेळण्यास प्रारंभ केला. माझा खेळ पाहून अरुण नरके, चंदू साळोखे यांनी माझे बंधू जयसिंग इंगवले यांना ‘अरे तुझा भाऊ पुढच्या वर्षी आमच्या संघातून खेळला पाहिजे. बाकी काय सांगायचे नाही.’ असा किस्सा शिवाजी तरुण मंडळाचे माजी फुटबॉलपटू आनंदराव इंगवले हे सांगत होते.
शिवाजी तरुण मंडळाची तिरंगा रंगाची जर्सी घालावी, असे पेठेतील प्रत्येक फुटबॉल खेळाडूंना वाटत असणारा तो काळ होता. मी १९७५ मध्ये अकरावी नापास झालो. त्याच काळात मलाही शिवाजी तरुण मंडळाच्या ‘अ’ नाही, तर ‘ब ’संघातून खेळण्याची इच्छा होती. मात्र, आपल्याला संधी मिळणार नाही, असे गृहीत धरून मी नंदू तिवले यांच्या यंग बॉईज संघातून मी बचावफळी उत्तम सांभाळली. हा खेळ पाहण्यासाठी गांधी मैदानात चंदू साळोखे, अरुण नरके, आदी ज्येष्ठ मंडळी हजर होती. माझा खेळ पाहून त्यांनी थेट माझ्या भावालाच सुनावले. अरे हा ‘शिवाजी’च्या संघाकडून खेळताना तो चक्क यंग बॉईजकडून खेळतोय. त्याला पुढच्या वर्षी आपल्या ‘शिवाजी’कडून खेळव, असे सुनावले. यावेळी बंधू जयसिंग यांनी सांगितले की, आपल्याकडून त्याला संधी मिळणार नाही, असे वाटल्याने त्याने यंग बॉईजकडून खेळावयास प्रारंभ केला.
पुढच्या वर्षी १९७६ ला मी शिवाजी तरुण मंडळाच्या ‘ब ’ संघ व ‘अ’ संघाकडून तब्बल दहा वर्षांहून अधिक काळ खेळलो.
या दरम्यान मी अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघाकडून खेळलो. भोपाळ विद्यापीठ विरोधात खेळताना तेथील उंचपुऱ्या खेळाडूंपुढे आमच्या विद्यापीठ संघातील खेळाडूंचा टिकाव लागला नाही. त्यामुळे आमच्यात कौशल्य असूनही १-० असा पराभव आम्हाला स्वीकारावा लागला.
- शब्दांकन : सचिन भोसले

यांनी घडविला
कोल्हापूरचा फुटबॉल...