शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गॅस गिझरच्या गळतीमुळे नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू, पोलिस तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:19 IST

शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण होणार स्पष्ट

सदाशिव मोरे

आजरा : बुरुडे (ता. आजरा) येथील भावेश्वरी कॉलनीत गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून सागर सुरेश करमळकर (वय ३२ ) व त्यांची पत्नी सुषमा सागर करमळकर (२६, दोघेही रा. मूळ गाव शिवाजीनगर आजरा) यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर  स्पष्ट होईल अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी दिली.

सागरचा विवाह २० मे रोजी झाला आहे. काल तो पत्नीसोबत आंबोलीला फिरण्यासाठी गेला होता. तेथून घरी आल्यानंतर तो फोन उचलत नव्हता व नंतर त्याचा फोन बंद झाला. त्याचे मित्र परिवार आज सोमवार सकाळी बुरुडेपैकी भावेश्वरी कॉलनीतील घरी भेटण्यासाठी गेले. घराचे समोरील दरवाजाला किल्ली अडकवलेली व दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. ते आतमध्ये गेले असता गॅसचा वास येत होता. यावेळी दोघेही बाथरूममध्ये पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याबाबतची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी करमळकर नवदांपत्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. लग्नानंतर एक महिन्यातच करमळकर नवदांपत्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.