शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीसाठी नव्याने प्रस्ताव

By admin | Updated: May 5, 2015 01:09 IST

सर्वेक्षण सुरू : नगररचना लागले कामाला; आठवड्यात आयुक्तांना अहवाल

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाने फेटाळल्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागात आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशाने नवा प्रस्ताव तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. महापालिका हद्दीपासून एक ते दोन किलोमीटर परिघात किती गावे समाविष्ट करून घेता येऊ शकतील, याची शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे. आठवड्यात नव्या हद्दवाढीचा प्रस्ताव आयुक्तांसमोर सादर करणार असल्याची माहिती सहायक संचालक नगररचना डी. एस. खोत यांनी ‘लोकमत’ला सांगितली. राज्य शासनाने एप्रिल महिन्यात ‘राजकीय विरोधामुळे कोल्हापूरची हद्दवाढ नाकारण्यात येत आहे,’ असे दोन ओळींचे पत्र लिहून कोल्हापूरची हद्दवाढ नाकारली. शासनाने हद्दवाढीस नकार दर्शविला असला तरी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सोडलेले नाहीत. आयुक्त पी. शिवशंकर यांनी हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या संभावित १९ गावातील नागरिकांची मनधरणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शहराच्या हद्दीच्या पाच किलोमीटर परिघात ७८ गावे तर १० किलोमीटर परिघात ९३ गावे येतात. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने गावे शहरात समाविष्ठ करण्यापेक्षा लगतच्या एक ते दोन किलोमीटर अंतरावरील गावांना शहरात समाविष्ठ करण्याच्या विचार पुढे आला. त्यानुसार नगररचना विभागाने अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले. शहराच्या हद्दीच्या एक किलोमिटर हद्दीत वडणगे, शिये, कळंबा, उचगाव, पाचगाव, आदी लहान-मोठी दहा गावे येतात तर दोन किलोमीटरच्या अंतरावर आंबेवाडी, निगवे, शिरोली एमआयडीसीसह १५ गावे येतात. या गावांचे विद्यमान जमीन वापर पृथ:करण, त्यावर अवलंबून असणारी लोक संख्या, शेती व्यवसायावर आधारित लोक संख्या, शहरातील साधन संपत्तीचा वापर करणारे लोक यांचे पृथ:करण व त्यानंतर सर्वेक्षण करण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. आठवड्यात सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती डी. एस. खोत यांनी दिली. (प्रतिनिधी)