‘टॅली, टुरिझम’मधून करिअरची नवी संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:03+5:302021-01-21T04:23:03+5:30

गडहिंग्लज : टॅली व ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड टुरिझमच्या माध्यमातून आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचा ...

New career opportunities from ‘Tally, Tourism’ | ‘टॅली, टुरिझम’मधून करिअरची नवी संधी

‘टॅली, टुरिझम’मधून करिअरची नवी संधी

गडहिंग्लज : टॅली व ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड टुरिझमच्या माध्यमातून आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी करिअरच्या नव्या वाटा शोधाव्यात, असे आवाहन शिवाजी विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्र. संचालक डॉ. ए. एम. गुरव यांनी केले.

येथील झेप अ‍ॅकॅडमीचा वर्धापनदिन व शिवाजी विद्यापीठाशी संलग्न ‘टॅली व ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड टुरिझम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गणपती नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रा. वासंती रासम यांनी ‘स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका : आकलन आणि विश्लेषण’ या विषयावर मार्गदर्शन केले.

‘रवळनाथ’चे संस्थापक-अध्यक्ष मल्लाप्पाण्णा चौगुले यांनी आजरा येथेही अ‍ॅकॅडमीची शाखा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.

याप्रसंगी प्राचार्य एस. एन. देसाई, रेखा पोतदार, प्रा. विनायक आजगेकर, गणपती नाईक, राजीव टोपले, सुरेखा भालेराव, नूरजहाँ सोलापुरे, किशोर भुसाई यांचा सत्कार केला.

यावेळी महेश मजती, वासुदेव मायदेव, आर. एस. निळपणकर, डी. के. मायदेव, शिवानंद घुगरे, सागर माने, बाबासाहेब मार्तंड, जितेंद्र बिद्रे, सीमा साठे, श्वेता टोण्णावर आदी उपस्थित होते.

मीना रिंगणे यांनी स्वागत केले. रेखा पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. नीतेश रायकर यांनी आभार मानले.

-------------------------

* फोटो ओळी :

गडहिंग्लज येथील कार्यक्रमात डॉ. ए. एम. गुरव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एम. एल. चौगुले, गणपती नाईक, मीना रिंगणे आदी उपस्थित होते.

क्रमांक : २००१२०२१-गड-०१

Web Title: New career opportunities from ‘Tally, Tourism’