शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: चैनीसाठी पैशांची गरज, चहात विषारी रसायन घालून नातवानेच केला आजीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:43 IST

मृत्यूची खात्री केली.. दागिने लुटले..

कोल्हापूर : चैनीसाठी दागिने लुटण्याकरिता चहातून मोरचूद केमिकल पाजून चुलत नातवाने गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या उषा मारुती भिऊंगडे (वय ७२) यांचा खून केल्याचे शुक्रवारी उघड झाले.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवून त्यांचा नातू प्रेम परशराम भिऊंगडे (वय २०, रा. चिंतामणी पार्क, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याला अटक केली. त्याने चैनीसाठी पैशांची गरज असल्याने सोन्याचे दागिने लुटण्यासाठी खून केल्याची कबुली पोलिस तपासात दिली.

पोलिसांनी सांगितले की, उषा भिऊंगडे या पतीसह राहात होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या एकट्याच घरी राहात होत्या. त्यानंतर पुतण्या परशराम त्यांना औषधे व इतर मदत करत असे. सोमवारी उषा या घरी बेशुद्ध पडल्या होत्या. त्यावेळी परशराम याने त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र त्या उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वाचा: आदल्या रात्री वडिलांनी सेवा केली, दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाने केला खून

त्याचवेळी उषा यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांची दिनयर्चा, त्यांच्यावर सुरू असलेले औषधोपचार, त्यांचे शेजारी व नातेवाईक अशा वेगवेगळ्या पातळीवरील माहिती घेऊन तपास केला. 

त्यावेळी मयत उषा यांचा चुलत नातू प्रेम मृत्यूच्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी घरी येऊन गेल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे प्रेम भिऊंगडे याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने चैनीसाठी पैशांची गरज होती. त्याला उषा यांचे दागिने लुटायचे होते. म्हणून सोन्यात वापरण्यात येणारे मोरचूद हे केमिकल मानवी जीवितास अपायकारक आहे, याची माहिती असताना ते चहामध्ये टाकले. तो चहा उषा यांना दिला. त्या चहा प्यायल्यानंतर बेशुद्ध पडल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तपास केला.

मृत्यूची खात्री केली.. दागिने लुटले..

मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर प्रेम याने उषा यांच्या दोन्ही हातातील सोन्याच्या सहा पाटल्या, गळ्यातील दाेन सोन्याच्या चेन, उजव्या कानातील फुल अशा सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. उषा या वयोवृद्ध असल्याने त्यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचा बनाव केला. त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Grandson Murders Grandmother for Jewelry in Kolhapur, Poisons Tea

Web Summary : In Kolhapur, a grandson murdered his grandmother by poisoning her tea to steal her jewelry for luxuries. Prem Bhiungade confessed to the crime. He laced her tea with a chemical, leading to her death and subsequent theft of her gold jewelry.