रस्ते सुरक्षा अभियानाच्या कार्यास लोकसहभागाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:31+5:302021-01-21T04:21:31+5:30

उचगाव : राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालवताना महामार्गाच्या नियमानुसारच लेनचा वापर करावा, वाहतूक रहदारी स्वयंशिस्तसाठी लोकसहभागाची गरज असून सडक ...

The need for public participation in the work of road safety campaign | रस्ते सुरक्षा अभियानाच्या कार्यास लोकसहभागाची गरज

रस्ते सुरक्षा अभियानाच्या कार्यास लोकसहभागाची गरज

उचगाव : राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालवताना महामार्गाच्या नियमानुसारच लेनचा वापर करावा, वाहतूक रहदारी स्वयंशिस्तसाठी लोकसहभागाची गरज असून सडक सुरक्षा, जीवन रक्षा यासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता पूजा बारटक्के यांनी केले.

उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्र, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने आयोजित ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच महादेव पाटील होते.

यावेळी सपोनि जगनाथ जानकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे, जयहिंद रोड बिल्डर्सचे अधिकारी विक्रम साळोखे, पेट्रोलिंग इनचार्ज प्रवीण भालेराव, प्रतीक थोरवत, चंद्रकात पाटील, अजय कांबळे, रोहित कांबळे उपस्थित होते.

फोटो २० उजळाईवाडी रस्ते सुरक्षा अभियान

:रस्ते सुरक्षा अभियानावेळी माहिती, शिक्षण व संवाद पत्रिकेच्या प्रकाशनप्रसंगी कार्य. अभि. पूजा बारटक्के, सपोनि जगन्नाथ जानकर, एपीआय सुरेश नलवडे, विक्रम साळोखे, सरपंच महादेव पाटील आदी.

Web Title: The need for public participation in the work of road safety campaign