नवोदय दूध संस्था नवा आदर्श निर्माण करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:29 IST2021-08-18T04:29:47+5:302021-08-18T04:29:47+5:30

वाघापूर (ता. भुदरगड) येथील नवोदय सहकारी दूध संस्थेच्या दूध उत्पादक सभासदांना कै. सौ. इंदुबाई नागोजी जठार यांच्या स्मरणार्थ दूध ...

Navodaya Dudh Sanstha will create a new ideal | नवोदय दूध संस्था नवा आदर्श निर्माण करेल

नवोदय दूध संस्था नवा आदर्श निर्माण करेल

वाघापूर (ता. भुदरगड) येथील नवोदय सहकारी दूध संस्थेच्या दूध उत्पादक सभासदांना कै. सौ. इंदुबाई नागोजी जठार यांच्या स्मरणार्थ दूध किटली वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. पी. मोरे होते.

प्राचार्य मोरे, सचिन संभाजी पाटील (विदर्भ कोकण बँक) असिफ पठाण (महा ई सेवा केंद्र गारगोटी), उत्तम मांडे, अभिजित पाटील, सतीश चौगले, संदीप कुंभार , मिलिंद जठार, भगवान कांबळे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्य प्रवर्तक मधुकर नागोजी जठार यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन आण्णासो जठार, व्हा. चेअरमन सविता मारुती कामिरकर, माजी सरपंच व्ही. के. पोवार, संजय जठार, पिंटू भोई, संतोष बरकाळे, संस्थापक अनिल सा. कामिरकर, संग्राम मा. दाभोळे, सचिव दीपक परीट उपस्थित होते. निवृत्ती कामीरकर यांनी आभार मानले.

फोटो ओळी : वाघापूर (ता. भुदरगड) येथील नवोदय दूध संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना युवराज येडुरे. शेजारी प्राचार्य एस. पी. मोरे, आण्णासो जठार, मारुती कामीरकर, मिलिंद जठार, सचिन पाटील आदी.

Web Title: Navodaya Dudh Sanstha will create a new ideal