शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी ‘कागल-राधानगरी लिमिटेड पक्ष’

By admin | Updated: August 29, 2015 00:27 IST

अरुण इंगवले यांचा घरचा आहेर : नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप

कोल्हापूर : पक्षाची पदे घ्यायची आणि घरी बसण्याची प्रवृत्ती पक्षात वाढली असून, नेत्यांचे जिल्ह्याच्या पूर्व भागात लक्ष नसल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉँग्रेस हा ‘राधानगरी-कागल-चंदगड लिमिटेड’च पक्ष असल्याची खरमरीत टीका पक्षाचे खजानीस अरुण इंगवले यांनी केली. नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप शुक्रवारी पक्षाच्या ताराबाई पार्क कार्यालयात झाले, त्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निरीक्षक दिलीप पाटील होते. पक्षांच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष हल्ला चढवीत इंगवले म्हणाले, गडहिंग्लज, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याने पक्ष कमकुवत होत आहे. राधानगरी, चंदगड, कागल, भुदरगड म्हणजे राष्ट्रवादी नव्हे. नेत्यांनी पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांकडे लक्ष द्या. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, दिल्लीतील सरकारला कळेना आणि राज्य सरकारला समजेना, अशी अवस्था झाल्याने येत्या वर्षभरात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून सरकारचे वाभाडे काढावे. पूर्र्वेकडे लक्ष नाही, असे म्हणू नका. जिल्हा बॅँकेचे दोन संचालक पूर्वेकडचे आहेत. काही ठिकाणी नाराजी आहे, ती दूर केली जाईल. पक्षात राहून चुकीची भूमिका कोणी घेत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. आजपर्यंत ताठ मानेने राजकारण केले, कारवाईही त्याच ताकदीने करू. दिलीप पाटील म्हणाले, सहकार चळवळ ही आपली शक्तिस्थळे आहेत, त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असून, कार्यकर्त्यांनी हा डाव उधळून लावत सरकारला सळो की पळो करून सोडावे. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे, असे आवाहन करीत सरचिटणीस अनिल साळोखे यांनी पक्षांतर्गत निवडणुकीत केलेल्या कामाबाबत त्यांनी कौतुक केले. जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रकाश पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, शिवानंद माळी, आदींनी मनोगत व्यक्त केले. फेटा राष्ट्रवादीचा, रसद विरोधकांना!महापालिका निवडणुकीचा संदर्भ देत, पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचे, पक्षाचा सत्कार स्वीकारायचा आणि आपली सगळी रसद विरोधकांना पुरवून त्यांचा प्रचार सुरू आहे. अशा प्रवृत्तीला पायबंद घाला, असे अरुण इंगवले यांनी सांगितले.