मुरगुडच्या नंदिनी साळोखेला राष्ट्रीय कुस्तीत सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:07+5:302021-02-05T06:52:07+5:30
काल याच आखाड्याच्या स्वाती शिंदे हिला कांस्यपदक मिळाले होते. पुन्हा एकदा मुरगूडच्या महिला मल्लानी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेवर दबदबा निर्माण ...

मुरगुडच्या नंदिनी साळोखेला राष्ट्रीय कुस्तीत सुवर्णपदक
काल याच आखाड्याच्या स्वाती शिंदे हिला कांस्यपदक मिळाले होते. पुन्हा एकदा मुरगूडच्या महिला मल्लानी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेवर दबदबा निर्माण केला आहे. नंदिनी आणि स्वातीची ही भारतीय कुस्ती संघाच्या लखनौ येथील सराव शिबिरासाठी निवड झाली आहे. नंदिनीने पहिल्या फेरीमध्ये मणिपूरच्या विद्याराणीला सातू डावावर चितपट केले, तर दुसऱ्या फेरीमध्ये आंध्र प्रदेशच्या हर्षलीला कलाजंग डावावर चीतपट करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत अत्यंत नेत्रदीपक कुस्ती झाली. हरियाणाची आंतरराष्ट्रीय पदक विजेती अंकुश हिच्या बरोबर पहिला वेळ खडाखडीत गेला. अत्यंत चुरशीने नंदिनी ने १३- ८ अशा गुण फरकाने अंकुशला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत ममता हिला सलग दोन वेळा साइड थ्रो मारून चार चार असे सलग आठ गुण मिळवून सुवर्णपदका वर आपले नाव कोरले. नंदिनीला आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक एनआयएस कोच दादासो लवटे, माजी नगराध्यक्ष सुखदेव येरूडकर, दयानंद खतकर, सागर देसाई, स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग कोच दर्शन वाघ, डार्फ केटलचे संतोष जगदाणे, क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांचे मार्गदर्शन तर खा. संजयदादा मंडलिक, ॲड. वीरेंद्र मंडलिक, साई राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण, कार्यवाह अण्णासाहेब थोरवत, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, पांडुरंग भाट, डॉ. प्रशांत अथणी यांचे प्रोत्साहन लाभले.
फोटो ओळ :
आग्रा येथील वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेला मुरगूड, ता. कागल येथील मल्ल नंदिनी साळोखे, सोबत प्रशिक्षक दादासाहेब लवटे.