उद्यानाचे ‘भीमाई उद्यान’ नामकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:24 IST2021-04-01T04:24:44+5:302021-04-01T04:24:44+5:30

कुरुंदवाड : पालिका येथील आदर्श नगरमध्ये नवीन उद्यान उभारणी करीत आहेत. त्यामुळे या उद्यानाचे भीमाई उद्यान असे नामकरण करण्यात ...

Name the park 'Bhimai Udyan' | उद्यानाचे ‘भीमाई उद्यान’ नामकरण करा

उद्यानाचे ‘भीमाई उद्यान’ नामकरण करा

कुरुंदवाड : पालिका येथील आदर्श नगरमध्ये नवीन उद्यान उभारणी करीत आहेत. त्यामुळे या उद्यानाचे भीमाई उद्यान असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी सुरेश कडाळे फौंडेशनच्यावतीने अध्यक्ष सुचितोष कडाळे यांनी मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदनाद्वारे केली आहे.

आदर्श नगरमधील गट नंबर २८८ व २९१ मध्ये पालिका नवीन उद्यानाची निर्मिती करीत आहेत ही बाब समाधानकारक आहे. या भागातील नागरिकांच्या भावनेचा आदर करीत या उद्यानाला भीमाई असे नाव देण्याची मागणी निवेदनात केली आहे. यावेळी फौंडेशनचे जय कडाळे, धम्मपाल ढाले, आप्पासो बंडगर, पांडुरंग आवळे, अमी शिंदे, बंटीश कांबळे, आदी उपस्थित होते.

फोटो - ३१०३२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - कुरुंदवाड येथे आदर्श नगरमधील नवीन उद्यानाला भीमाई असे नामकरण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी निखिल जाधव यांना देण्यात आला. यावेळी सुचितोष कडाळे, जय कडाळे, आप्पासो बंडगर उपस्थित होते.

Web Title: Name the park 'Bhimai Udyan'