शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-रत्नागिरी महामार्ग मे अखेर पूर्ण होणे कठीण, कधी झाली कामाला सुरुवात, किती टक्के काम पुर्ण झाले..वाचा सविस्तर

By भीमगोंड देसाई | Updated: January 30, 2026 12:37 IST

आंबा घाटात सुरक्षित जाळी

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : कोकण आणि विदर्भाला जोडणाऱ्या नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गातील आंबा ते चोकाकपर्यंतचे काम पूर्ण करण्याची मुदत मे २०२६ अखेरपर्यंत मुदत आहे. याचे आतापर्यंत काम ६३ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम या मुदतीत पूर्ण करणे आव्हानात्मक आहे. ठेकेदार कंपनीस मे अखेरपर्यंत मुदत असली तरी तीन महिने आणखी मुदतवाढ मिळू शकते, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नागपूर ते सांगलीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे. सांगली ते कोल्हापूरपर्यंतचा रस्ता रखडला आहे. चोकाक परिसरातील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामाला गती येणार आहे. चोकाक ते आंब्यापर्यंतचे काम गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी मिऱ्याबंदर ते आंबापर्यंतचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील काम किरकोळ राहिले आहे. सध्या आंबा घाटातील काम युद्धपातळीवर केले जात आहे.

पाऊस अधिक असल्याने पावसाळ्यात दरड कोसळत असते म्हणून आंबा घाटात दोन्ही बाजूला सुरक्षिततेसाठी जाळी लावली जात आहे. आंबा ते चोकाकपर्यंतच्या कामात अनेक अडचणी येत आहेत. त्यावर मात करून कामे केले जात आहे. या टप्प्यातील मोठे डोंगर फोडून उड्डाणपूल बांधले जात आहेत. तीव्र वळणे काढली जात आहेत. यामुळे कामास विलंब होत आहे, असे प्रशासन म्हणणे आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली

पन्हाळा तालुक्यातील आवळी आणि हातकणंगले तालुक्यातील शिरोली-बसवनखिंड येथे टोलनाके होणार आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही टोल नाक्यावरून टोल वसुली होणार आहे.

सन २०२३ पासून काम सुरू...

आंबा ते पैजारवाडी ४५ किलोमीटर तर पैजारवाडी ते चोकाक ३२ किलोमीटरचा रस्ता सन २०२३ पासून होत आहे. पावसाळ्यात प्रचंड पाऊस असल्याने काम गतीने करता येत नाही. मध्यंतरी भूसंपादनाच्याही अडचणी आल्या होत्या. परिणामी काम वेळेत पूर्ण झालेले नाही. तब्बल ४५ मीटर रुंद हा रस्ता होत आहे. यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर ते नागपूरपर्यंतचा प्रवास सुसाट होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur-Ratnagiri Highway Completion Unlikely by May End: Details Inside

Web Summary : Nagpur-Ratnagiri highway's completion faces delays; only 63% done. Challenges include land acquisition, heavy rains, and difficult terrain. Target is May 2026, but extension possible. Toll booths planned post-completion for this 45-meter wide road.