शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरची प्रक्रिया सुरू, कोल्हापूरची कधी...?

By admin | Updated: January 15, 2015 00:35 IST

कुलगुरू निवड : मुदतीनंतर सोलापूरकडे कार्यभार शक्य

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांची मुदत २५ फेब्रुवारीला संपत असल्याने तोपर्यंत नव्या कुलगुरूंची निवड होणे शक्य नसल्याने कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोलापूरच्या कुलगुरूंकडे अथवा अन्य कुणाकडे तरी दिला जाण्याची शक्यता आहे. हा कार्यभार कुणाकडे दिला जावा, हे कुलपती या नात्याने राज्यपाल निश्चित करतात. राज्यपालांनी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया आज, बुधवारपासून सुरू केली. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया कधी सुरू होणार, यासंबंधी विद्यापीठ क्षेत्रात उत्सुकता आहे.
नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू विनायक देशपांडे यांची मुदत सहा फेब्रुवारीला संपत आहे. म्हणून तेथील कुलगुरू शोधप्रक्रिया सुरू झाली. शिवाजी विद्यापीठाने कुलगुरू शोध समितीवर विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या एका व्यक्तीचे नाव सुचवायचे असते. त्यानुसार दिल्लीतील रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. दिनकर मश्नू साळुंके यांच्या नावाचा प्रस्ताव ८ डिसेंबरला राजभवनाकडे पाठविला. मुळात एकच नाव पाठवायचे असताना साळुंके व नागपूर येथील नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे (निरी) संचालक डॉ. एस. आर. वाटे यांचेही नाव पाठविले. त्याला राजभवनाने हरकत घेतली. कुलगुरू निवडीसाठी राज्यपाल तीनसदस्यीय शोध समिती नियुक्त करतात. त्यांनी सुचविलेला सदस्य हा त्या समितीचा अध्यक्ष असतो. प्रधान सचिव किंवा त्याहून वरच्या दर्जाचा अधिकारी या समितीवर नियुक्त करते व विद्यापीठाने सुचविलेला सदस्य अशीही समिती असते; परंतु राज्यपाल व राज्य शासनानेच नावे निश्चित न केल्याने शोध समिती अस्तित्वात आली नाही. शोध समिती स्थापन झाल्यावर ती निवड प्रक्रियेसाठी संपर्क अधिकाऱ्यांची निवड करते. हे अधिकारी वृत्तपत्रांत जाहिरात देऊन कुलगुरुपदासाठी अर्ज मागवितात. कुलगुरुपदासाठी अर्जाची मुदतच महिनाभर असते. या महिन्याअखेर ही समिती स्थापन झाल्यास मार्चअखेर नव्या कुलगुरूंची निवड होऊ शकते.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू शोध समितीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यासंबंधीच्या अनुषंगिक मंजुरीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
- प्रवक्ता, राजभवन मुंबई


कुलगुरू कोण...?
नवा कुलगुरू कोण, याविषयी शैक्षणिक क्षेत्रात उत्सुकता आहे. ही निवड राजभवन करीत असले तरी त्याला मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहोर आवश्यक असते. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे अन्य पात्रतेपेक्षा ती व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या विचारधारेशी निगडित हवी, हीच त्यांच्या निवडीची महत्त्वाची पात्रता असेल.