शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर माझी आई : सुलोचना

By admin | Updated: June 1, 2015 00:51 IST

पोस्टर्स अन् कलाकारांची प्रसिद्धी

कोल्हापूर : आज जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व जरी हरवले असले तरी, मला अभिनेत्री म्हणून ओळख ‘जयप्रभा’च्या सावलीतच मिळाली. मी पडद्यावर आईच्या भूमिका सक्षमपणे साकारल्या असल्या तरी माझ्या पाठीशी खंबीरप्रमाणे उभे राहणारे कोल्हापूर हे माझी आईच आहे. कोल्हापूर, भालजी पेंढारकर यांना मी कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत अभिनेत्री सुलोचना यांनी कोल्हापूरबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. चित्रकार रियाज शेख यांच्या संग्रहातील सिनेपोस्टरांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी सुलोचना यांच्या हस्ते झाले. यानंतर कलाप्रेमींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शेख यांच्या संग्रहातील सिनेपोस्टरांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये १९२१ ते ७० च्या दशकांतील सिनेपोस्टर मांडली असून हे प्रदर्शन ६ जूनपर्यंत खुले आहे. यामध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ या सिनेमाचे पोस्टर आहे. पहिला बोलपट आलमआरा, वक्त, मदर इंडिया, कल्याण खजिना, होमी वाडिया यांचे स्टंटपट आहेत. याशिवाय शिवाजी महाराज, राणी येसूबाई यांसह मराठी-हिंदीमधील गाजलेल्या सिनेमांची पोस्टर्स या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. अध्यक्षस्थानी चंद्रकांत जोशी होते. याप्रसंगी राजा उपळेकर, एस. निंबाळकर, संजय शेलार, शांता तांबे, सुभाष भुर्के, आदी उपस्थित होते. रियाज शेख यांनी प्रास्ताविक केले. पोस्टर्स अन् कलाकारांची प्रसिद्धी यावेळी कलाप्रेमींशी संवाद साधताना सुलोचना यांनी तत्कालीन सिनेजगतातील पोस्टर्सचे इंगित उलगडले. त्यावेळी पोस्टर्सवर कलाकाराची छबी झळकली की तो स्टार झाला, अशी समजूत असायची. आजही त्यावेळी पोस्टर पाहायला होणारी गर्दी डोळ्यांसमोरून हटत नाही, असेही त्या म्हणाल्या.