महापालिका प्रभाग रचना, आरक्षणावर आज सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:10+5:302021-01-21T04:23:10+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना व आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली असून, ...

महापालिका प्रभाग रचना, आरक्षणावर आज सुनावणी
कोल्हापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना व आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली असून, त्यावर मागविण्यात आलेल्या हरकती व सुचनांवर आज, गुरुवारी सुनावणी होत आहे. साखर आयुक्त व राज्य निवडणूक आयोगाकडील उपायुक्त यांच्यासमोर सुनावणी ठेवण्यात आली आहे.
सुनावणीकरिता महापालिका प्रशासनाने वेळ निश्चित केली आहे. प्रभाग क्रमांक १ ते २५ करिता सकाळी १०.३०, प्रभाग क्रमांक २६ ते ५० करिता सकाळी ११ वाजता, प्रभाग क्रमांक ५१ ते ७५ करिता सकाळी ११.३० वाजता, प्रभाग क्रमांक ७६ ते ८१ करिता दुपारी १२ वाजताची वेळ देण्यात आली आहे. याखेरीज अन्य हरकतदार यांना दुपारी १२.३० वाजताची सुनावणीसाठी वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. याची संबंधित हरकतदार यांनी नोंद घ्यावी व सुनावणीस उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.