शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत शाहू छत्रपती-उद्धव ठाकरे यांची भेट, चार पिढ्यांतील संबधांना उजाळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 15:16 IST

औदार्ह पाठिंब्याचे अन् कृतज्ञतेचेही..

कोल्हापूर : काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी कोल्हापुरात न्यू पॅलेसवर येऊन शाहू छत्रपती यांना पाठिंबा देण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेवढे औदार्ह दाखविले, तेवढेच औदार्ह शाहू छत्रपती यांनी निवडून आल्यानंतर ठाकरे यांचे मातोश्रीवर जाऊन कृतज्ञता व्यक्त करून दाखविले. शाहू छत्रपती आणि उद्धव ठाकरे यांच्या सोमवारी सकाळी झालेल्या गळाभेटीने या दोन कुटुंबातील चार पिढ्यांमधील स्नेहपूर्ण संबधांनाही उजाळा मिळाला.महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या कोल्हापूर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून शाहू छत्रपती यांचे नाव निश्चित झाले होते. उमेदवारी जाहीर होण्याची केवळ औपचारिकता बाकी राहिली होती. त्याच दरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सांगलीत जाहीर सभा होती. या सभेला जाण्यापूर्वी उजळाईवाडी विमानतळावरून थेट न्यू पॅलेस गाठले. त्यांनी शाहू छत्रपतींची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी शाहू छत्रपती यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तुमच्या प्रचार सभेलाही येणार असल्याचे सांगितले. प्रसार माध्यमांसमोर येऊन त्यांनी तसे स्पष्ट केले आणि मगच ते सांगलीकडे रवाना झाले. दिलेल्या शब्दाप्रमाणे ठाकरे दि. १ मे रोजी झालेल्या जाहीर सभेस आले, तडाखेबंद भाषणही केले.लोकसभेचा निकाल जाहीर झाला आणि शाहू छत्रपती दीड लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर शाहू छत्रपती सोमवारी सकाळी मुंबईतील ‘मातोश्री’वर पोहोचले. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचेही आभार मानले. ही एक कौटुंबिक भेट असल्याने आमदार सतेज पाटील यांच्यासह मालोजीराजे छत्रपती तसेच रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे असे मोजकेच सदस्य यावेळी उपस्थित होते. सुमारे तासभर गप्पा रंगल्या. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. विधानसभेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी म्हणून आपणाला एकत्रित काम करायचे असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरे