शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Voting 2026: कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार, सात ठिकाणी मतदान केंद्रात तांत्रिक बिघाड

By संदीप आडनाईक | Updated: January 15, 2026 17:13 IST

तांत्रिक अडचणींमुळे मतदारांचा खोळंबा

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापुरात आज, गुरुवारी सकाळपासून सुरु असलेल्या मतदानासाठी मतदारांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर रांगाच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. दुपारी साडेचार वाजेपर्यंत ५०.८५ टक्के मतदान झाले. 

खासदार श्री शाहू छत्रपती यांनी नवीन राजवाडा शेजारील असलेल्या न्यू पॅलेस मराठी शाळा मतदान केंद्रात, जाऊन मतदानाचा अधिकार बजावला. आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर, आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्यान कार्यालयात, खासदार धनंजय महाडिक यांनी सपत्नीक रुईकर कॉलनी येथील मतदान केंद्रावर मतदान केले. नेत्यांनी आपापल्या मतदान केंद्रावर मतदान करुन सर्व प्रभागातील मतदानाची पाहणी केली. 

साडेतीन वाजेपर्यंत १, २७, ९७३ पुरुष आणि १, २३, ५६५ महिला अशा एकुण २, ५१, ५४८ जणांनी मतदान केले. सकाळी ९.३० वाजेपर्यंत केवळ ९.६४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत मतदानाचा वेग किंचित वाढला असून, ११.३० वाजेपर्यंत शहरात एकूण २२.४५ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये ६०,५३१ पुरुष आणि  ५०,५४७ महिला अशा एकूण ११,१०८५ मतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारी १.३० वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. यामध्ये ९५,६६१ पुरुष आणि ८७,३६१ महिला अशा एकूण १८,३०३० मतदारांनी आपला हक्क बजावला. 

कोल्हापुरच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्यासमवेत शीतल तेली-उगले यांनी ताराबाई पार्क येथील जीएसटी कार्यालयातील पिंक मतदान केंद्रास, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, छत्रपती शाहाजी महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज, गोखले कॉलेज, महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूल, आय.टी.आय., सायबर कॉलेज येथील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निऱ्हाळी यांनीही शहरातील ताराराणी विद्यापीठ, सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर, लक्ष्मीबाई जरग शाळा, शिलादेवी शिंदे सरकार हायस्कूल, तपोवन शाळा व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथील मतदान केंद्रांची पाहणी केली.

तांत्रिक अडचणींमुळे मतदारांचा खोळंबा

दरम्यान, लक्षतीर्थ वसाहत, महालक्ष्मी मंदिर परिसर आणि जुना बुधवार पेठ येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल अशा सात मतदान केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळ उडाला. मशीनमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी खास पथक पाचारण करण्यात आले. या तंत्रज्ञांनी स्वतंत्र बॅलेट युनिट बदलले. मात्र यासाठी लागलेल्या तासभराच्या वेळामुळे मतदारांचा खोळंबा झाला. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत राहिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Elections 2026: Leaders Vote, Technical Issues Delay Polling

Web Summary : Kolhapur witnessed enthusiastic voting in municipal elections, reaching 50.85% by 4:30 PM. Leaders cast votes and monitored polling. Technical glitches at seven centers caused delays, later resolved, ensuring smooth voting.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६VotingमतदानSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकEVM Machineईव्हीएम मशीन