शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

‘वारणा’च्या विरोधात आंदोलन

By admin | Updated: January 21, 2015 23:53 IST

नवे पारगावात रास्ता रोको : ऊसदर जाहीर करण्याची 'स्वाभिमानी'ची मागणी

नवे पारगाव : तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने एफ.आर.पी.प्रमाणे ऊसदर जाहीर न केल्याने तसेच चौदा दिवसांत ऊसतोड झालेली बिले जमा न केल्याने ‘वारणे’च्या संचालकांवर फौजदारी दाखल करावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे आज, मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. तत्काळ निर्णय न झाल्यास ‘वारणावर हल्लाबोल’ आंदोलनाचा इशारा ‘स्वाभिमानी’ने यावेळी दिला. पेठवडगाव पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. प्रशासनाच्यावतीने वाठारचे मंडल अधिकारी अरुण कांबळे यांनी निवेदन स्वीकारले. येथील महात्मा गांधी हॉस्पिटलजवळ वारणानगर-वाठार रस्त्यावर रास्ता रोको केला. हातात ऊस, निषेधाचे फलक व निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. रस्त्यावरच आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मारल्याने वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही दिशेला वाहनांची रांग लागली. वडगाव पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. आंदोलनस्थळी स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष शिवाजी माने म्हणाले, एकेकाळी उच्चांकी गाळप व दर देणाऱ्या ‘वारणा’ने सध्या उच्चांकी गाळप व नीचांकी दर दिल्याने शेतकऱ्यांची विश्वासार्हता गमावली आहे. वैभव कांबळे म्हणाले, ऊस उत्पादकांची ‘वारणा’ने फसवणूक करून शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचे काम केले आहे.स्वाभिमानीच्यावतीने साखर सहसंचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखाना सुरू होऊन दोन महिने झाले तरीही ‘वारणा’ने शुगर केन कंट्रोल कायद्यानुसार तोडणीनंतर १४ दिवसांनंतर ऊस बिल दिले नाही. एफ.आर.पी.नुसार दर जाहीर केला नाही. ७ जानेवारीस निवेदन देऊनही ‘वारणा’चे संचालक मंडळ बेफिकीर आहे. त्यामुळे संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. यावेळी वैभव कांबळे, शिवाजी माने, महावीर पाटील, विलासराव पाटील, किरण पाटील, संपतराव पोवार, शिवाजी शिंदे, अरुण मगदूम, सुरेश पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. पोलीस उपअधीक्षक प्रकाश घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)