शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भुदरगड पतसंस्थेतील गहाण सोने परत मिळत नाही, कर्जदारांनी केल्या तक्रारी : बैठकीत काहींना रडू कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:25 IST

कोल्हापूर : सोने गहाण कर्जावेळी दिलेले सोने पतसंस्थेकडे प्रत्यक्षात नसून, आम्ही पैसे भरण्यास तयार असूनही संस्था आमचे सोने ...

कोल्हापूर : सोने गहाण कर्जावेळी दिलेले सोने पतसंस्थेकडे प्रत्यक्षात नसून, आम्ही पैसे भरण्यास तयार असूनही संस्था आमचे सोने परत देत नसल्याचे गुरुवारी येथे अवसायानात निघालेल्या भुदरगड सहकारी पतसंस्थेच्या काही कर्जदारांनी सांगितले. पतसंस्थेतील कर्जदारांसाठी ओटीएस योजना लागू करा, चुकीच्या पद्धतीने झालेल्या लिलाव प्रक्रियेची सखोल चौकशी करा, अशा सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी यावेळी दिल्या. त्यांच्या पुढाकारातूनच ही बैठक झाली. यावेळी काही कर्जदारांना आपल्या व्यथा सांगताना रडू कोसळले.

भुदरगड थकबाकीदार कर्जदारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन आमदार आबिटकर यांनी कर्जदार व अधिकारी यांच्यात संवाद घडवून आणला. अवसायक मंडळाकडून सुरू असलेल्या कर्ज वसुली प्रक्रियेमुळे नाधवडे ( ता. भुदरगड) येथील कर्जदार शामराव पाटील यांनी कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांचे भाऊ उमाजी पाटील यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले. उद्योग-व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याने संस्थांच्या प्राॅपर्टी व जमिनींवर बोजा चढविण्यात आले आहेत. ओटीएसकरिता तयार असणाऱ्या कर्जदारांनाही योजनेपासून वंचित ठेवून त्यांच्याकडून सक्तीने कर्जवसुली करत असल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

अवसायक मंडळाकडून कर्जदारांना कर्ज वसुलीच्या नोटीस लागू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार आबिटकर यांनी कर्जदारांशी सहानुभूतीने वागण्याच्या सूचना दिल्या. कर्जदारांना मानवतेच्या भावनेतून मदत करण्याकरिता अवसायक मंडळाने सहकार्य करावे, असेही त्यांनी सुचवले. या बैठकीला प्रभारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, लेखापरीक्षक व अवसायक मंडळ सदस्य डी. बी. यादव, विशेष कार्यकारी अधिकारी हर्षवर्धन यादव, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक दत्तात्रय उगले, कल्याण निकम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आबूभाई तहसीलदार उपस्थित होते.

फोटो: ०२०९२०२१-कोल-भुदरगड

फोटो ओळ : अवसायनात गेलेल्या भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या थकबाकीदार कर्जदारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी गुरुवारी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहावर आमदार प्रकाश आबिटकर यांनी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी कर्जदारांनी आपल्या व्यथा मांडल्या.