शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

सरकारीपेक्षा कोविड खासगी रुग्णालये अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST

संदीप बावचे : शिरोळ शिरोळ तालुक्यात १ हजार ८० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून शासकीय कोविड सेंटरमध्ये २८० रुग्ण उपचार घेत ...

संदीप बावचे : शिरोळ

शिरोळ तालुक्यात १ हजार ८० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून शासकीय कोविड सेंटरमध्ये २८० रुग्ण उपचार घेत आहेत. तर घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या ४१९ असून उर्वरित रुग्ण खासगी ठिकाणी उपचार घेत आहेत. ४७ दिवसात ५५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर कोरोना बाधितांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळेना, अशी परिस्थिती आहे.

१ एप्रिल ते १७ मे अखेर २८५९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १७७९ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची संख्या चांगली असलीतरी घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांमुळे संसर्गाचा मोठा धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने तालुक्यातील २२ शाळा क्वारंटाईनसाठी ताब्यात घेतल्या आहेत.

सध्या घर टू घर सर्वेक्षण सुरू असून सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकाला नागरिकांनी घरी रुग्ण असल्याची माहिती देऊन लक्षणे असलेल्यांनी स्वॅब तपासणीसाठी देणे तितकेच गरजेचे आहे. तरच रुग्णसंख्या रोखता येणार आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालल्याने प्रशासन यंत्रणा हतबल झाली आहे.

----------------------

चौकट - खासगी रुग्णालये अधिक

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाची तीन रुग्णालये असून यामध्ये २८० बेड आहेत. तालुक्यातील खासगी ठिकाणी तर उर्वरित रुग्ण सांगली, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर याठिकाणी उपचार घेत आहेत. सरकारी कोविड सेंटरमध्ये सुविधांची वाणवा असल्याने खासगी रुग्णालयांचे चांगलेच फावत आहे. तर खासगी लॅबमध्ये तपासणीचे प्रमाण वाढले आहे.

चौकट - खासगीमध्ये दैनंदिन दर कोरोनाबाधित रुग्ण खासगी रुग्णालयातील अतिदक्षतामध्ये ऑक्सिजनवर असेल तर दिवसाला साडेसात हजार रुपये, अतिदक्षता बाहेरील जनरल वॉर्डमध्ये प्रतिदिन चार हजार रुपये खर्च येतो. दहा दिवसाला साधारणत: प्रत्येक रुग्णाला ७० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे.