महाराष्ट्र वाहतूक सेनेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:44 IST2021-03-13T04:44:59+5:302021-03-13T04:44:59+5:30

इचलकरंजी : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्याविरोधात महाराष्ट्र वाहतूक सेनेने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी नायब तहसीलदार उदय गायकवाड यांना मागण्यांचे ...

Morcha of Maharashtra Vahatuk Sena at the provincial office | महाराष्ट्र वाहतूक सेनेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

महाराष्ट्र वाहतूक सेनेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

इचलकरंजी : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्याविरोधात महाराष्ट्र वाहतूक सेनेने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी नायब तहसीलदार उदय गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन दिले.

गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. या दरवाढीचा वाहतूक व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. इंधन दरवाढीमुळे भाड्यामध्ये वाढ करावी लागत आहे. त्यामुळे भाडे मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत उदरनिर्वाह करणे अवघड होत आहे. केंद्र सरकारने लवकर इंधनाचे दर कमी करावेत अन्यथा महाराष्ट्र वाहतूक सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मोर्चामध्ये महादेव गौड, दिनेश परमार, सयाजी चव्हाण, शिवानंद हिरेमठ, विजय देवकर, नीलेश परदेशी, मेहबूब पठाण, इम्रान सनदी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

फोटो ओळी

१२०३२०२१-आयसीएच-०२

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात इचलकरंजीत महाराष्ट्र वाहतूक सेनेने प्रांत कार्यालयावर गाडी ओढत मोर्चा काढला.

छाया-उत्तम पाटील

Web Title: Morcha of Maharashtra Vahatuk Sena at the provincial office