शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’मध्ये ३०३४ प्रकरणे मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST

कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राबविलेल्या ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ या उपक्रमामध्ये सातवा ...

कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राबविलेल्या ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ या उपक्रमामध्ये सातवा वेतन आयोग, अनुकंपा, सेवानिवृत्तीवेतन आदी विविध स्वरूपातील ३,०३४ प्रकरणे सोमवारी मार्गी लागली. त्यातील २,७६४ प्रकरणे उपक्रम सुरू होण्यापूर्वी, तर २७० प्रकरणे दिवसभरात निकाली निघाली. अनुकंपा तत्वावरील सातजणांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. शासनमान्य ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा आणि त्यांना ओळखपत्र देण्याच्या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून मंत्री सामंत यांनी ‘उच्च शिक्षण मंत्रालय आपल्या दारी’ या राज्यस्तरीय उपक्रमाची सुरूवात केली.

शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच यावेळेत ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ उपक्रम राबविण्यात आला. उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांच्या समस्या सोडविण्यासाठीच्या या उपक्रमासाठी मंत्री सामंत यांच्यासह उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, संचालक डॉ. धनराज माने, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी, ग्रंथालय संचालनालयाचे संचालक डॉ. शालिनी इंगोले, कला संचालनालयाचे संचालक डॉ. राजीव मिश्रा, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, प्रकाश आबिटकर उपस्थित होते. या उपक्रमासाठी ऑनलाईन स्वरूपात ९०० निवेदने सादर झाली होती. निवेदने सादर केलेल्या व्यक्ती, संस्था दिलेल्या टोकन क्रमांकानुसार व्यासपीठावर येऊन प्रश्न, समस्या मांडत होत्या. त्या समजून घेऊन त्यांच्या निवेदनावर मंत्री सामंत हे त्याबाबत पुढील कार्यवाहीच्या शेरा नोंदवून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत होते. पाच तास चाललेल्या या उपक्रमात ३९४ जणांनी प्रत्यक्षात प्रश्न मांडले. अजिनाथ दडस, सुमीत चव्हाण, जयश्री कौलापुरे, अक्षय शिंदे, चिंतामणी कोरे, सुरज शिंदे, विजय सिताप यांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती आदेशाची पत्रे देण्यात आली. आर. बी. माडखोलकर महाविद्यालय (चंदगड), म्हैशाळ महाविद्यालय (मिरज), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (उमदी) येथे मुक्त विद्यापीठाची अभ्यास केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.