ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात प्राप्त झालेले अर्ज : १४२५
वर्षभरात दाखल झालेली प्रकरणे : ३६३५
दिवसभरात दाखल झालेली प्रकरणे : ३९४
त्रुटी असलेली प्रकरणे : ४८०
प्रलंबित राहिलेली प्रकरणे : ३९३
अन्य निर्णय
१) शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ज्वेलरी डिझायनिंग अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी
२) विद्यापीठात शिवभोजन थाळी, रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय
३) विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्रासाठी १५ दिवसांत एक कोटींचे अनुदान देणे
४) विद्यापीठातील राजर्षी शाहू केंद्राअंतर्गत मराठी भाषा संवर्धनाचे नियोजन
५) शासन धोरणानुसार प्रत्येक विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे अभ्यासकेंद्र सुरू करणे
चौकट
१४ वर्षांनंतर मिळाल्या ‘पीएफ’च्या पावत्या
या उपक्रमात भविष्य निर्वाह निधीच्या (पीएए) पावत्या कुलगुरूंकडे प्रदान करण्यात आल्या. १४ वर्षांनंतर विद्यापीठ आणि न्यू कॉलेजमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या पावत्यांचा त्यात समावेश होता. विद्यापीठातील २२ कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीचा दोन वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला. त्यांना एकूण ६० लाखांच्या ग्रॅच्युईटीचे धनादेश वितरित केले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे चेहरे समाधानाने फुलले.
चौकट
कोल्हापूर विभागातील मार्गी लागलेली प्रकरणे
सातवा वेतन आयोग वेतननिश्चिती (२३८), अनुकंपा (३४), वेतन देयकात नाव समाविष्ट करणे (८०), सेवानिवृत्ती वेतन (४९२), सेवानिवृत्ती उपदान (३४१), शिक्षकेतर कर्मचारी वेतननिश्चिती (९६), अर्जित रजा रोखीकरण (४३), भविष्य निर्वाह निधी (४३३), स्थान निश्चिती (४८५), तात्पुरते सेवानिवृ्त्ती वेतन (९), वैद्यकीय देयके (५३१).
चौकट
या संस्थांची शिष्टमंडळे
या उपक्रमात शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटना, शिक्षण संस्थाचालक, सेवक संघ, सुटा, सुप्टा, व्यवस्थापन परिषद सदस्य, नेट-सेट पीएचडीधारक संघर्ष समिती, महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना, टॅफनॅप, मनविसे, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती, आदी विविध २७० शिष्टमंडळांनी प्रत्यक्ष भेटून प्रश्न मांडले. मात्र, यावेळी अनेक सोशल डिस्टन्सिंगचे भान राहिले नाही.