शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-कोरोनाच्या तपासणीसाठी मिरजमध्ये लवकरच नवीन लॅब, राज्यमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:42 IST

कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी मिरजमध्ये लवकरच नवीन लॅब उभी करीत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अद्याप एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. यापुढचा टप्पा अतिशय महत्त्वाचा व काळजी घेणारा असल्याने वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून शासनाला सहकार्य करावे,असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

ठळक मुद्देकोरोनाच्या तपासणीसाठी मिरजमध्ये लवकरच नवीन लॅबसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर : कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी मिरजमध्ये लवकरच नवीन लॅब उभी करीत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अद्याप एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. यापुढचा टप्पा अतिशय महत्त्वाचा व काळजी घेणारा असल्याने वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी आज भेट देवून पाहणी केली. यावेळी तपासणीसाठी नेपाळहून आलेल्या 43 प्रवाशांची भेट घेवून त्यांनी विचारपूस केली.

या प्रवाशांपैकी कोणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत. यानंतर कोरोनाबाबत आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, विजय देवणे, राजेश लाटकर आदींसह वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.राज्यात उद्भवलेल्या कोरोनाबाबत शासन गंभीर असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग युध्दपातळीवर काम करीत आहेत, असे सांगून सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी मिरजमध्ये लवकरच नवीन लॅब उभी करीत आहोत.

कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागास देण्यात आल्या आहेत. यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयांबरोबरच इंडियन मेडिकल असोसिएशनचे सहकार्य घेणार असून, जिल्ह्यामध्ये अद्याप एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नसल्याचे त्यांनी सांगितले.कोरोनाच्या दृष्टीने यापुढचा टप्पा अतिशय महत्त्वाचा व काळजी घेणारा असल्याने नागरिकांनी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यानंतर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री  यड्रावकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा करून कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयministerमंत्रीkolhapurकोल्हापूर