शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयडीसी’चा कारभार प्रादेशिक अधिकाऱ्याविना

By admin | Updated: December 17, 2015 01:40 IST

उद्योजकांची गैरसोय : गेल्या आठ महिन्यांपासून पद रिक्त

सतीश पाटील-- शिरोली  -महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाला गेल्या आठ महिन्यापासून प्रादेशिक अधिकारी नाही, सध्या पुण्याचे अजित रेळेकर हे अधिकारी आठवड्यातून दोनवेळा येतात, पूर्णवेळ प्रादेशिक अधिकारी नसल्याने उद्योजकांची मोठी गैरसोय झाली आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक विभागांतर्गत कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारले आहेत. पण नवीन उद्योग उभारण्यासाठी आणि जुन्या उद्योजकांना उद्योग चालू ठेवताना बऱ्याच अडचणी येत असतात. जुने प्रादेशिक अधिकारी अशोक पाटील यांची आठ महिन्यांपूर्वी धुळे येथे बदली झाल्यापासून कोल्हापूर विभागाला प्रादेशिक अधिकारीच कोणी आलेले नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांमधून शासनाच्या तिजोरीत कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फंड जमा होतो, पण उद्योजकांना सुविधा मात्र उपलब्ध होत नाहीत. कोल्हापूर विभागाला प्रादेशिक अधिकारीच नसल्याने उद्योजकांची अनेक कामे खोळंबली आहेत.गेल्या आठ महिन्यांपासून शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक), गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा), कागल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (मॅक) च्या माध्यमातून उद्योजकांनी कोल्हापूरला पूर्णवेळ प्रादेशिक अधिकारी मिळावा म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग सचिव भूषण गगराणी यांना निवेदन दिले आहेत, पण पूर्ण वेळ अधिकारी मिळालेला नाही. या विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळणार की अर्धवेळ अधिकाऱ्यांवरच अवलंबून रहावे लागणार आहे, हा प्रश्न आहे.गेल्या आठ महिन्यांपासून कोल्हापूर विभागाला पूर्णवेळ प्रादेशिक अधिकारीच नसल्याने उद्योजकांची अनेक कामे खोळंबली आहेत. पूर्णवेळ अधिकारी द्यावेत, याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग सचिव भूषण गगराणी यांच्याशी असोसिएशनच्या माध्यमातून लेखी निवेदन देऊन संपर्क साधला आहे. -राजू पाटील, उपाध्यक्ष, स्मॅकहे प्रश्न प्रलंबित उद्योजकांचे भूखंड फेरफार करणे भूखंडाची परवानगीइमारत पूर्ण झालेले प्रमाणपत्रकर (फाळा)आॅडिटअग्निशमन दलाच्या अटीकंपनीच्या नावात बदलउद्योजकांच्या नावात बदलभूखंड घटना बदलउद्योगाचे अंतर्गत बदलसुरक्षाबांधकाम परवानगी