सभासदांनी उत्पादक गरजेसाठीच कर्जे काढावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:51+5:302021-01-20T04:25:51+5:30

कोगनोळी : नव्याने पैसा निर्माण होईल अशा उत्पादक गोष्टींसाठीच सभासदांनी कर्जे काढावीत. त्यामुळे परतफेड वेळेत होईल. सहकार टिकून राहील. ...

Members should take out loans only for productive needs | सभासदांनी उत्पादक गरजेसाठीच कर्जे काढावीत

सभासदांनी उत्पादक गरजेसाठीच कर्जे काढावीत

कोगनोळी : नव्याने पैसा निर्माण होईल अशा उत्पादक गोष्टींसाठीच सभासदांनी कर्जे काढावीत. त्यामुळे परतफेड वेळेत होईल. सहकार टिकून राहील. असे मत पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते कोगनोळी येथील श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द या संस्थेच्या नूतन वास्तूचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संस्थापक चेअरमन सचिन खोत यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सचिन खोत यांनी चार वर्षात २५ कोटी ठेव तसेच चार शाखांची निर्मिती हे केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. दत्तगुरु पतसंस्था कोरोनामुळे बधीर झालेल्या समाजातील अर्थव्यवस्थेतील सर्वसामान्य जनतेवर विश्वास ठेवून त्यांना कर्ज पुरवठा करेल व आर्थिक सबळ बनवेल, असा विश्वास प्रा. सुभाष जोशी यांनी व्यक्त केला. माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा परिषद सदस्य जयवंत कांबळे, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, गणेश बेकरीचे संस्थापक अण्णासाहेब चकोते, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, प्रसन्नकुमार गुजर उपस्थित होते.

चौकट

प्रास्ताविक करताना चेअरमन सचिन खोत यांना बंधू नीलेश खोत, वडील आनंदा खोत यांचे योगदान नमूद करताना भावना अनावर झाल्या. हे पाहून वडिलांपेक्षा श्रेष्ठ पुत्राचा वडिलांना अभिमानच वाटतो, असा उल्लेख प्राध्यापक सुभाष जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात केला.

फोटो ओळ : कोगनोळी येथील दत्तगुरु पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

छाया : बाबासो हळीज्वाळे

Web Title: Members should take out loans only for productive needs