शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाबाबत महिन्याभरात बैठक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST

कोल्हापूर : येथील कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्याबाबत दिल्ली येथे महिन्याभरात बैठक होण्याची शक्यता आहे. ...

कोल्हापूर : येथील कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्याबाबत दिल्ली येथे महिन्याभरात बैठक होण्याची शक्यता आहे. नागरी उड्डयन खात्याने या विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. तत्कालीन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी दोन वर्षांपूर्वी या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.

कोल्हापूर विमानतळ सुरू करण्यात छत्रपती राजाराम महाराज यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या विमानतळास त्यांचे नाव देण्यासाठी राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, राष्ट्रीय मोडी विकास प्रबोधिनी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून गेल्या २२ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव दि. २७ मार्च २०१८ रोजी विधिमंडळात करण्यात आला. हा ठराव राज्य शासनाने नागरी विमान वाहतूक विभागाकडे पाठविला. त्यानंतर दि. २ फेब्रुवारी २०१९ रोजी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही नामकरणाची घोषणा केली. त्यावर पुढे नागरी उड्डयन खात्याने नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला. आता या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे. औरंगाबाद येथील खासदार डॉ. भागवत कराड यांनी नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली. त्यावर शिर्डी, कोल्हापूर, औरंगाबादसह अन्य १३ विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती मंत्री पुरी यांनी दिली. मंत्रिमंडळाची बैठक महिन्याभरात होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया

कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याबाबत महिन्याभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. या नामकरणासाठी गेल्या २२ वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. नामकरणाची अंमलबजावणी सरकारकडून लवकर व्हावी.

- ललित गांधी, अध्यक्ष, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन