तब्बल २२४० जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:23 IST2021-05-23T04:23:58+5:302021-05-23T04:23:58+5:30

लॉकडाऊन सुरू असले तरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, वाढवलेल्या चाचण्या हे यासाठी कारण असल्याचे सांगण्यात येते; परंतु कोरोनामुक्त ...

As many as 2240 people defeated Corona | तब्बल २२४० जणांची कोरोनावर मात

तब्बल २२४० जणांची कोरोनावर मात

लॉकडाऊन सुरू असले तरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, वाढवलेल्या चाचण्या हे यासाठी कारण असल्याचे सांगण्यात येते; परंतु कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा दिलासादायक आहे. कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक ३५६ पॉझिटिव्ह रुग्ण आले असून, त्याखालोखाल करवीर तालुक्यात २७६, हातकणंगले तालुक्यात १५७ रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूर शहरातील ९ जणांचा मृत्यू झाला असून, हातकणंगले आणि करवीर तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

कोल्हापुरात ९ जणांचा मृत्यू

कोल्हापूर ०९

सुतार मळा, स्टेशन रोड, मोरे नगर, विक्रमनगर, मंगळवार पेठ, टेंबलाईवाडी, रंकाळा, शिवाजी पेठ, जवाहरनगर

हातकणंगले ०५

नागाव, तळंदगे, नेज, रूग्र्, कबनूर

करवीर ०५

केर्ले, पाडळी खुर्द, खेबवडे, उजळाईवाडी, उचगाव

कागल ०४

मलगे, खडकेवाडा २, सुळकुड

इचलकरंजी ०३

इचकरंजी, जय भीमनगर २

चंदगड ०१

सूंडी

गडहिंग्लज ०१

कुमरी

भुदरगड ०१

राणेवाडी

राधानगरी ०१

हालबेवाडी

पन्हाळा ०१

गिरोली

इतर ०३

चिक्कोडी, कडेगाव, आप्पाचीवाडी

Web Title: As many as 2240 people defeated Corona