रिक्षाचालकांसाठी ‘आरटीओ’त स्वतंत्र खिडकी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:26 IST2021-03-23T04:26:12+5:302021-03-23T04:26:12+5:30

कोल्हापूर : रिक्षाचालकांच्या कामाकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयात खास स्वतंत्र खिडकी करावी यासह विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम आदमी पार्टी ...

Make a separate window in RTO for rickshaw pullers | रिक्षाचालकांसाठी ‘आरटीओ’त स्वतंत्र खिडकी करा

रिक्षाचालकांसाठी ‘आरटीओ’त स्वतंत्र खिडकी करा

कोल्हापूर : रिक्षाचालकांच्या कामाकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयात खास स्वतंत्र खिडकी करावी यासह विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम आदमी पार्टी रिक्षाचालक संघटनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन अल्वारीस यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.

या निवेदनात रिक्षा परवाने, पासिंग आदी बाबी ऑनलाईन आहे. सर्व इंग्रजीमध्ये असल्याने ते रिक्षाचालकांना कळत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी मराठीतून अर्ज ठेवावेत. रिक्षाचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र खिडकी करावी. यात कागदपत्रे स्कॅनिंग, पैसे ट्राॅन्सफर आदी कामे करून द्यावीत. कामकाजासंबंधी वेळ व तारीख या खिडकीतूनच रिक्षाचालकांना मिळेल अशी व्यवस्था करावी. प्रलंबित थांब्यांना मंजुरी द्यावी. रिक्षाचालकांची कामे त्वरित करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संदीप देसाई, राकेश गायकवाड, लाला बिरंजे, बाबुराव बाजारी, महेश घोलपे, प्रकाश हरणे, आदी उपस्थित होते.

Web Title: Make a separate window in RTO for rickshaw pullers