शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर ‘महायुती’च, पण अध्यक्ष ‘राष्ट्रवादी’चाच - हसन मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:17 IST

'विरोधक अर्धे राज्य देण्याचे आश्वासनही देतील. परंतु, त्याला बळी पडू नका'

गडहिंग्लज : दोन्ही राष्ट्रवादीमधील पहिले ऐक्य चंदगडमध्ये व नंतर पुणे जिल्ह्यात झाले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात यापुढेही कायमचे एकत्र राहणार आहोत. भविष्यात चंदगड व गडहिंग्लज मतदारसंघ वेगळे झाले तरी दोन्ही आमदार राष्ट्रवादीचेच असतील. जिल्हा परिषदेवर महायुतीचीच सत्ता येईल. परंतु, अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल, असा विश्वास वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

नूल येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील तालुक्यातील राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यानिमित्ताने कुपेकर बहिण-भाऊ, चव्हाण काका-पुतणे एकत्र आले. स्व. कुपेकरांनी बांधलेला पक्ष पुन्हा मजबूत झाला, असेही त्यांनी नमूद केले. माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, स्व. कुपेकर, नरसिंगराव पाटील व अजितदादांना खरी श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे.

वाचा: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणाचे १२ तालुक्यांत २४ रंग; कुणी दिली पक्षाला सोडचिठ्ठी, कुणाची विरोधकांशी हातमिळवणी

डॉ. नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, मुश्रीफांमुळेच आम्ही एकत्र आलो. त्यामुळे कार्यकर्ते व जनतेतील गैरसमज दूर झाले. एक-दोन कार्यकर्ते बाहेर गेले तरी जनता राष्ट्रवादीसोबतच आहे.
प्रकाश चव्हाण म्हणाले, केवळ मुश्रीफांच्या सहकार्यामुळेच गडहिंग्लज कारखान्याचे चाक फिरत आहे. त्यांच्यामुळेच आम्ही निवडणुकीला सामोरे जात असून अनेक कुटूंबे एकत्र आली आहेत.
यावेळी उदय जोशी, जयसिंग चव्हाण, भैरू पाटील-वाघराळकर यांचेही भाषण झाले.

सभेस गडहिंग्लज कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, वरदशंकर वरदापगोळ, डॉ. यशवंत चव्हाण, रामराज कुपेकर, संतोष पाटील-कडलगेकर आदींसह सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अर्धे राज्यही देतील

विरोधकांकडून लाखाची नव्हे तर कोटीची भाषा सुरू आहे. अर्धे राज्य देण्याचे आश्वासनही देतील. परंतु, त्याला बळी पडू नका, असे आवाहन नंदिनी बाभूळकर यांनी केले.

अजितदादांना माझा शब्द, मात्र जोशी नाव विसरले !

चंदगड एकच राहिला तर नंदिनी बाभूळकर किंवा राजेश पाटील यांच्यापैकीच एक आमदार होईल असे उदय जोशी यांनी भाषणात नमूद केले. मात्र, चंदगड, गडहिंग्लज वेगळे झाले तर राष्ट्रवादीला दोन आमदार आणि चंदगड एकच राहिले तरीही आमदार राष्ट्रवादीचाच होईल. असा शब्द आपण अजितदादांना अडकूरच्या सभेत दिला होता. परंतु, जोशींनी नाव जाहीर करायचे विसरले, असा चिमटा माजी आमदार राजेश पाटील यांनी काढला.

English
हिंदी सारांश
Web Title : MahaYuti in Kolhapur Zilla Parishad, Nationalist Congress Party President: Hasan Mushrif

Web Summary : Hasan Mushrif expressed confidence that MahaYuti will rule Kolhapur Zilla Parishad, with a Nationalist Congress Party president. He highlighted unity among party members and emphasized the party's strength, even if constituencies change. He urged people to support Nationalist Congress Party candidates.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेस