शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-ZP Election: ‘महाविकास’मध्ये मिटतंय तर ‘महायुती’मध्ये पेटलंय!; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:14 IST

काहींचे पक्षांतर, काहींचा इशारा 

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांची संख्या वाढतच निघाल्याने आज बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड झुंबड उडणार आहे. रात्री उशिरापर्यंत अनेक तालुक्यात राजकीय घडामोडी सुरूच होत्या. यामध्ये ‘महाविकास आघाडीमध्ये मिटतंय परंतु महायुतीमध्ये पेटलंय’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

प्रत्येक तालुक्यातील छोट्या गटांना, नेत्यांना स्थान देताना दोन्हीकडील नेत्यांची दमछाक होत आहे. उमेदवारी मिळणार नसल्याने पक्षांतरालाही प्रारंभ झाला असून राजीनामेही दिले जात आहेत. जिल्हा परिषदेसाठी २४९ तर पंचायत समितीसाठी ३०३ उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज दाखल केले आहेत.

मंगळवारी दिवसभर झालेल्या घडामोडीत शिरोळ, हातकणंगले, गगनबावडा तालुक्यात शिंदेसेना आणि भाजप युती नक्की झाली आहे. हातकणंगलेमध्ये उर्वरित जागांसाठी जनसुराज्यसोबत चर्चा सुरू आहे. राधानगरीमध्ये शिंदेसेना-भाजप युती फिस्कटली आहे. तर भुदरगडचा निर्णय अजून झालेला नाही. शाहूवाडी, पन्हाळ्यात भाजप-जनसुराज्य स्वतंत्र लढणार आहे.

कागलमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप एकत्र आले असून शिंदेसेना स्वतंत्र आहे. तर चंदगडमध्ये भाजप स्वतंत्र लढेल हे स्पष्ट झाले आहे. आजऱ्यामध्ये दोन्हीकडे गोंधळ सुरू आहे. काँग्रेसचे ४० उमेदवार हात चिन्हावर रिंगणात उतरणार असून करवीर वगळता अन्य ११ तालुक्यातील जागा वाटपाचा प्रश्न मिटला असल्याचे सांगण्यात आले.

शीतल फराकटे यांची टीका

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी उमेदवारी मिळणार नसल्याने व्हिडिओच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली असून आम्ही केवळ सभाच गाजवायच्या का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी अपक्ष उभारणार असल्याचेही जाहीर केले.

ए.वाय. काँग्रेससोबत

जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील यांनी राधानगरी तालुक्यात काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. भोगावती कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते देखील काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Elections: Cracks in Alliance as Nomination Deadline Nears

Web Summary : Kolhapur ZP elections see tensions within alliances as the nomination deadline approaches. Mahavikas Aghadi shows unity, while Mahayuti faces internal conflicts. Seat distribution challenges and candidate dissatisfaction lead to defections and resignations across various talukas.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी