शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 18:35 IST

कोल्हापूर जिल्ह्यांतील दहा मतदार संघात अत्यंत ईर्षेने ग्रामपंचायत निवडणूकीला होते तसे मतदान सोमवारी विधानसभा निवडणूकीसाठी झाले. राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात ७८. ३२ टक्के इतके झाले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरला ईर्षेने ७५ टक्के मतदानशांततेत बजावला हक्क : पावसाने उसंत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यांतील दहा मतदार संघात अत्यंत ईर्षेने ग्रामपंचायत निवडणूकीला होते तसे मतदान सोमवारी विधानसभा निवडणूकीसाठी झाले. राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात ७८. ३२ टक्के इतके झाले आहे.

मतदानास अजून तासाचा अवधी शिल्लक असल्याने किमान ७५ टक्के मतदान होईल असा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्त केला. मागील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे मतदानादिवशी काय होते याची सर्वांनाच चिंता लागून राहिली होती परंतू दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने मतदार व उमेदवारांचाही उत्साह वाढला. जिल्ह्यांत किरकोळ शाब्दिक बाचाबाची वगळता कुठेही अनुचित प्रकार अथवा दुबार मतदानाच्या तक्रारी झाल्या नाहीत.जिल्ह्यांत दहा मतदार संघात १०६ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, भाजपचे उपाध्यक्ष धनंजय महाडिक व शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक या सर्वांचीच राजकीय प्रतिष्ठा या निवडणूकीत पणाला लागली आहे.

गेली आठवडाभर रोजच दुपारनंतर पाऊस येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळच्या टप्प्यातच मतदान करावे असे आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला व सकाळी सातपासूनच मतदान प्रक्रियेने वेग घेतला. सकाळच्या टप्प्यात गावोगावी वैरण, शेतीची कामे करण्यात लोक गुंतल्याचे चित्र दिसत होते.अनेकांनी अगोदर मतदान केले व मगच दैनंदिन कामासाठी लोक बाहेर पडले.

पाऊस सुरु झाला तर वृध्द, आजारी, दिव्यांग मतदारांना बाहेर काढणे शक्य होणार नाही म्हणून अगोदर त्यांना प्राधान्याने मतदानास आणण्यात आले. मतदारांना आणण्यासाठी सर्रास वाहनांचा वापर झाला. कांही ठिकाणी मतदान केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागत होता त्यामुळेही लांबच्या लांब रांगा लागल्या. तरुणांईसह महिला, वृध्द, ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानाचा हक्क बजावल्यानेच मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. निवडणूकीत चुरस जरुर होती परंतू कुठेही तणाव नव्हता त्यामुळे लोकांनी निर्भयपणे येवून मतदान केले. 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kolhapurकोल्हापूरkarvir-acकरवीर