शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

यड्रावकर यांना भाजपच्या झेंड्याचे एवढे वावडे का..? रामचंद्र डांगे यांची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 13:13 IST

कुरुंदवाड : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील ...

कुरुंदवाड : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे छायाचित्र वापरला नाही. भाजपचे झेंडे, बॅनर याचा वापर जाणीवपूर्वक टाळला आहे. त्यांना भाजपच्या झेंड्याचे एवढे वावगे का वाटत आहे.. त्यांना आता भाजपची गरज नाही, त्यामुळे भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवली जाईल, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते व कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ डांगे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिला.डांगे म्हणाले, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, तालुका मंडल अध्यक्ष मिलिंद भिडे, शिरोळ मंडल अध्यक्ष संभाजी भोसले, अन्वर जमादार यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय भोजे व तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत धैर्यशील माने यांच्या प्रचारावेळी भाजपाचे झेंडे, नेत्याचे फोटो व कार्यकर्ते सोबत घ्यायला शिंदे गटाला अडचण नव्हती. मग विधानसभेलाच अडचण का निर्माण झाली आहे. यड्रावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरताना शिंदे गटाला मिळालेल्या जागेवर भरला हे त्यांनी विसरू नये. अर्ज दाखल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील या प्रमुख नेत्याचे छायाचित्र वापरले नाही शिवाय भाजपचे झेंड्याचा वापर जाणीवपूर्वक टाळला. त्यांना महायुतीतून उमेदवारी मिळाली असताना केवळ स्वतःचा गट मजबूत करण्यासाठी त्यांनी भाजपला फाट्यावर मारले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत मोठी नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीत भोजे किंवा गावडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचेही डांगे यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४shirol-acशिरोळBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024