शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १७ गावांत धावणार महारेशीम रथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:24 IST

collector Kolhapur- रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करण्याकरिता जिल्ह्यात महारेशीम अभियान घेण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १७ गावात प्रबोधनाचा रथ धावणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रथाला हिरवा बावटा दाखवून अभियानाचा प्रारंभ झाल्याचे जाहीर केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रथाला हिरवा बावटा दाखवून सुरुवात १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार अभियान

कोल्हापूर : रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करण्याकरिता जिल्ह्यात महारेशीम अभियान घेण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १७ गावात प्रबोधनाचा रथ धावणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रथाला हिरवा बावटा दाखवून अभियानाचा प्रारंभ झाल्याचे जाहीर केले.निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, रेशीम विकास अधिकारी संजय शिंदे, प्रकल्प अधिकारी बी.एम. खंडागळे, जिल्हा मनरेगा समन्वयक संजय पवार, तांत्रिक सहाय्यक तानाजी शिर्के, वाय.ए. पाटील, शेतकरी तानाजी पाटील उपस्थितीत हा अभियान उद्घाटन सोहळा झाला.आजपासून सात दिवस हा रथ जिल्ह्यातील १७ गावातून धावणार आहे. गडहिग्लज, करवीर, हातकणंंगले असे तीन समूह तयार केले आहेत. प्रत्येक समुहात पाच ते सहा गावांचा समावेश करण्यात आला आहे.

गडहिंग्लज समूहांतर्गत सरोळी, कुमरी, कानडेवाडी, कळीवडे, मुरकुटेवाडी, करवीर समुहांतर्गत म्हाळुंगी, कोतोली, पुनाळ, राधानगरी, कोथळी, पणोरी व हातकणंगले समुहातंर्गत यळगुड, लक्ष्मीवाडी, वाळवे खुर्द, सोनाळी, तळसंदे, व्हनाळी या गावात फिरवण्यात येणार आहे.ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांनाच लाभहा रथ जाणाऱ्या मार्गावर जागेवरच ऑनलाईन नोंदणी होणार आहे. ऑनलाईन नोंदणी बंद होणार असल्याने लाभार्थींनी परिपूर्ण कागदपत्रांसह नोंदणी करावी. अभियान कालावधीत नोंदणी करणाऱ्यानाच २०२१-२२या आर्थिक वर्षात मनरेगा योजनेंतर्गत शासनाच्या निकषानुसार पात्र राहतील. यासाठी समूहनिहाय, ग्रामपंचायतनिहाय कृती आराखडा तयार केला आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर