‘खासगी प्राथमिक शिक्षक’ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी महादेव डावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:41 IST2021-02-06T04:41:52+5:302021-02-06T04:41:52+5:30

कोल्हापूर : येथील कोल्हापूर महानगरपालिका खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी महादेव डावरे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब लंबे तर ...

Mahadev Daware as the President of 'Private Primary Teachers' Credit Union | ‘खासगी प्राथमिक शिक्षक’ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी महादेव डावरे

‘खासगी प्राथमिक शिक्षक’ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी महादेव डावरे

कोल्हापूर : येथील कोल्हापूर महानगरपालिका खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी महादेव डावरे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब लंबे तर सचिवपदी सारीका पाटील यांची एकमताने निवड झाली.

संस्थेच्या सभागृहात संचालक मंडळाची सभा झाली. अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी म्हणून सहकार खात्यातील लेखापाल व्ही. एस. आर. काळे होते. आपल्या पतसंस्थेच्या सभासदांच्या हिताच्या विविध योजना राबविण्याची ग्वाही महादेव डावरे यांनी दिली. संस्थेने अल्पावधीतच गरूडभरारी घेतली आहे. एकमताने कारभार होत असल्याने संस्थेने उज्ज्वल यश संपादन केल्याचे संस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांनी सांगितले. ज्येष्ठ संचालक आनंदा हिरूगडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक राजेश कोंडेकर, अनिल सरक, शिवाजी भोसले, चंद्रकांत पाटील, कुमार पाटील, अशोक पाटील, विकास कांबळे, राजाराम हुल्ले, छाया हिरूगडे, सूर्यकांत बरगे, सुनिल आबदार, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी उपस्थित होते.

फोटो (०४०२२०२१-कोल-महादेव डावरे (अध्यक्ष), बाळासाहेब लंबे (उपाध्यक्ष), सारीका पाटील (सचिव)

Web Title: Mahadev Daware as the President of 'Private Primary Teachers' Credit Union