शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

म. गांधींचे राजकीय गुरू, शिष्य महाराष्ट्रातीलच

By admin | Updated: October 9, 2015 00:41 IST

सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात ‘विमर्श व संवाद’ या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : महात्मा गांधीजींना नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या रूपाने महाराष्ट्राने ‘राजकीय गुरुत्व’ आणि आचार्य विनोबा भावे यांच्या रूपाने सर्वांत मोठा पहिला शिष्यही प्रदान केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी येथे गुरुवारी केले.शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र, इतिहास अधिविभाग व गांधी अभ्यास केंद्रातर्फे ‘विमर्श व संवाद’ या अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ यावर बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. आर. बी. पाटील, तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. ज. रा. दाभोळे प्रमुख उपस्थित होते.यावेळी‘विमर्श व संवाद’ या एन. ए. निकम लिखित व डॉ. ज. रा. दाभोळे अनुवादित पुस्तकाचे डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.डॉ. मोरे म्हणाले, नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची राजकारणाच्या अध्यात्मीकरणाची संकल्पना गांधीजींना भावली. त्या आधारे अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील चळवळ यशस्वी केली. या पार्श्वभूमीवर गोखले- लोकमान्य टिळक यांच्यातील दरी कमी करण्याचे त्यांनी प्रयत्न केले. गांधीजींना भारत समाजसेवक संघटनेचे सदस्यत्व देण्याचे गोखले यांनी ठरविले होते; पण प्रस्थापित सदस्यांमुळे ते होऊ शकले नाही; अन्यथा गांधीजी पुण्यातच राहिले असते आणि गोखले यांच्या माघारी नेमस्तांचे नेतृत्व त्यांच्याकडे आले असते. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा ‘लोकमान्य ते महात्मा’ या संक्रमणात दडलेला आहे. गांधीजींबद्दल समाजमाणसांत पसरलेले विविध प्रवाद-अपप्रवाद पाहता हे संक्रमण अद्यापही पूर्ण झाले नाही. ‘विमर्श व संवाद’ हे पुस्तक म्हणजे तत्त्वज्ञानाचे पूर्वसुरी तत्त्वज्ञानाबद्दल नेमका कोणता विचार करीत असत, यासंदर्भातील महत्त्वाचा दस्तावेज आहे. डॉ. दाभोळे म्हणाले, तत्त्वज्ञान अभ्यासकांच्यादृष्टीने हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी डॉ. वासंती रासम, प्रकाश पवार, भगवान माने, आदी उपस्थित होते. डॉ. भारती पाटील यांनी प्रास्ताविक केले. मराठ्यांच्या अपेक्षांना छेद...ब्रिटिशांनी भारत जिंकला म्हणजे दिल्लीचे तख्त ताब्यात घेतले. तथापि, ब्रिटिशांनी प्रत्यक्षात ज्यांच्याशी लढाया करून भारत जिंकला, ते मराठे होते. त्यामुळे राजकारणाची समज, लढवय्येपणा, धडाडी या बळावर स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राच्या नेतृत्वाने वर्चस्व राखले. त्यामुळे महात्मा गांधी यांचा राजकीय पटावरील उदय हा मराठ्यांच्या अपेक्षांना छेद देणारा ठरला, असे निरीक्षण डॉ. मोरे यांनी यावेळी नोंदविले.