कोल्हापूर : औषधे वाहतूक करणारी कागदपत्रे दाखवून कंटेनरमधून लाखो रुपयांची देशी दारू बेकायदारित्या नेणाऱ्या कंटेनरला पकडून ४० लाखांची दारु आणि २५ लाख रुपयांचा कंटेनर असा ६५ लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. कोल्हापूर-सांगली रोडवरील मजले (ता. हातकणंगले) येथे शुक्रवारी ही कारवाई झाली.
या प्रकरणी चालक भलाराम नरपतराम बिष्णोई (वय २७ रा. भेडा ढाणी, पमाणा,जि. जालोर,राजस्थान) याला अटक केली.
परवाना औषधांचा असून त्यातून दारुची वाहतूक करत असल्याची माहिती अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि शहर उपअधीक्षक युवराज शिंदे यांना समजली. त्यांनी तातडीने या परिसरात पथक नेमून सापळा रचला.
चालकाकडे कागदपत्रांची मागणी केल्यानंतर त्याने औषधांची वाहतूक करीत असल्याची कागदपत्रे दाखविली. मात्र पथकाला संशय आल्याने त्यांनी कंटेनरची झडती घेतील. त्यात दारुचे एक हजार बॉक्स सापडले.
कारवाईत निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, कांचन सरगर, सचिन लोंढे, विलास पवार, विशाल भोई, धीरज पांढरे, प्रसाद माळी, सुशांत बनसोडे, अमोल यादव यांनी सहभाग घेतला.
Web Summary : Kolhapur excise team seized ₹40 lakh liquor hidden in a container displaying medicine transport documents. A Rajasthan driver was arrested near Majale. Officials found 1,000 liquor boxes during inspection, suspecting false documentation.
Web Summary : कोल्हापुर में औषधि परिवहन दस्तावेजों वाले कंटेनर से 40 लाख रुपये की शराब जब्त की गई। मजले के पास राजस्थान का एक ड्राइवर गिरफ्तार। अधिकारियों को नकली दस्तावेजों पर संदेह होने पर निरीक्षण के दौरान 1,000 शराब के बक्से मिले।