शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कुडित्रे-वाकरेत विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : ऐन सणासुदीच्या काळात बालिंगा फिडरवरून विजेचा पुरवठा होणाऱ्या वाकरे, कुडित्रे, कोपार्डे, आडूर, भामटे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : ऐन सणासुदीच्या काळात बालिंगा फिडरवरून विजेचा पुरवठा होणाऱ्या वाकरे, कुडित्रे, कोपार्डे, आडूर, भामटे, चिंचवडे या गावांत विजेचा लपंडाव सुरू असल्याचे पिण्याचे पाणी, दळप कांडप यासह अन्य जनजिवनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. फुलेवाडी ग्रामीण विभागाच्या बालिंगा सबस्टेशनवरून वाकरे, कुडित्रे, कोपार्डे, आडूर, भामटे, चिंचवडे या गावांना घरगुती व शेतीसाठी वीज पुरवठा केला जातो. जुलै महिन्यात आलेल्या महापुराने अनेक ठिकाणी विजेचे ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्यात बुडाले होते, तर विजेचे पोल कोसळल्याने वीजपुरवठा चार ते पाच दिवस खंडित होता; पण यानंतर कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करून बहुतांश वीजपुरवठा सुरळीतपणे सुरू केला होता. मात्र, यानंतर वाकरे कुडित्रेसारख्या मोठ्या गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन सणाच्या काळात वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे याबाबत कर्मचारी व व बालिंगा सबस्टेशनशी संपर्क केला, तर तेथून उध्दट उत्तर मिळत असल्याने कुडित्रे ग्रामस्थ संतापले असून, याविरोधात मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोट : ऐन सणासुदीच्या काळात घरगुती वीजपुरवठा वारंवार सलगपणे चार पाच तास खंडित होत आहे. याचा परिणाम पाणीपुरवठा व दळपकांडपावर होत आहे. यावर उपाययोजना नाही केली, तर महावितरणच्या कुडित्रे शाखेवर मोर्चा काढणार आहे. ज्योत्स्ना पाटील, (सरपंच, कुडित्रे)

कोट : महापुराच्या काळापासून कुडित्रे गावातील घरगुती वीजपुरवठा सलगपणे कधीच नाही. रात्री-अपरात्री चार -पाच तास सलग वीज खंडित होत असते. याबाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जाते. एखाद्या महिन्यात वीजबिल भरणा केला, तर वीज तोडायला कर्मचारी हजर राहतात.

सागर शेलार (ग्रामस्थ, कुडित्रे)