शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवनदायी’ योजनेचा पंचनामा होणार !

By admin | Updated: September 4, 2014 00:08 IST

जिल्हा परिषदेत चौकशीचा निर्णय : अनेक गैरप्रकारांवरून आरोग्य विभागाच्या बैठकीत जोरदार चर्चा

कोल्हापूर : राजीव गांधी जीवनदायी योजनेमधून आतापर्यंत झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत आज करण्यात आला. येत्या चार दिवसांत संबंधितांना बोलावून योजनेचा पंचनामा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आरोग्य समितीचे सभापती अनिल मादनाईक होते. राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली, पण त्याचा उपयोग लाभार्र्थींना होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याबाबत ‘लोकमत’ने या योजनेच्या कारभाराचा पर्दाफाश करत हा विषय लावून धरला होता. त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत उमटले. योजना चांगली आहे, पण त्याची देखरेख करण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याचे सांगत जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबीटकर यांनी हा विषय लावून धरला. हॉस्पिटलकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी लाभार्थींच्या असल्याचे निदर्शनास आणून देत आतापर्यंत झालेल्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव आबीटकर यांनी मांडला. उपचारानंतर शासनाकडून वेळेत पैसे मिळत नाहीत, उपचाराएवढेच पैसे शासनाकडून मिळत असल्याने डॉक्टर टाळाटाळ करत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला. एक जिल्हा समन्वयक व दोन कर्मचारी यावर या योजनेचा डोलारा सुरू असल्याचे सांगत कोण काय करते, हेच कळत नाही. ग्रामीण जनतेसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या योजनेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे अर्जुन आबीटकर यांनी निदर्शनास आणून दिले. यावर येत्या चार दिवसांत आतापर्यंत झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव झाला. बैठकीला सदस्य शहाजी पाटील, परशुराम तावरे, मानसिंग पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, आदी उपस्थित होते.