शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीतील विहिरी मोजताहेत अखेरच्या घटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहराची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी ८२ वर्षांपूर्वी बांधून दिलेल्या दोन विहिरी ...

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहराची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी ८२ वर्षांपूर्वी बांधून दिलेल्या दोन विहिरी सर्वांच्याच अक्षम्य दुर्लक्षपणामुळे मोजताहेत शेवटच्या घटका! गेली ८२ वर्षे शहराची पिण्याची व खर्चाच्या पाण्याची तहान भागविणा-या या दोन विहिरींची अतिशय दुर्दशा झाली असल्याचे वास्तव पाहवयास मिळत आहे. विहीर व परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला असून विहिरीचे संपूर्ण बांधकामही ढासळत चालले आहे. परिणामी विहिरी मुजतात की काय, अशी परिस्थिती पाहवयास मिळत आहे.

छत्रपती राजाराम महाराजांनी शहराची जीवनदायिनी ठरलेल्या या दोन विहिरींचे जतन करण्यासाठी नगरपरिषदेने पुढे येण्याची गरज आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून अगदी १९७६ पर्यंत हुपरी व संपूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र स्वरूपाची टंचाई असायची. १९७६ मध्ये हुपरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना सुरू झाली अन् परिसरातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली. तत्पूर्वी छत्रपती शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांचा हुपरीशी विविध कारणांनी सातत्याने संपर्क येत असे. तत्कालीन गाव कामगार पोलीस पाटील यडगोंडा पाटील यांनी सन १९३९ मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या कानावर घातली. त्यांनी ताबडतोब गावानजिक असलेल्या म्हेतरमळ्यामध्ये जागा घेऊन त्या ठिकाणी दोन विहिरीची खोदाई करण्याबरोबरच त्यांचे भक्कम बांधकामही करून घेतले. त्यावेळेपासून आजपर्यंत सलग ८२ वर्षे अव्याहतपणे या विहिरीतून शहरातील गावभागाला पाणीपुरवठा होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांच्या प्रयत्नातून दहा वर्षांपूर्वी दूधगंगा नदीवरून शहरासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. तेव्हापासून या विहिरीचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले. नगरपरिषदेच्या माध्यमातून या योजनेतून शहराला स्वच्छ व भरपूर पाणीपुरवठा होत असल्याने लोकप्रतिनिधी बरोबरच शहरवासीयांचेही या विहिरींकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा अनुभव येत आहे. परिणामी गेल्या ८२ वर्षांपासून शहराची पिण्याची व खर्चाच्या पाण्याची तहान भागविणा-या या दोन विहिरींची अतिशय दुर्दशा झाली असून शेवटच्या घटका मोजत असल्याचे वास्तव पाहवयास मिळत आहे.

फोटो ओळी -हुपरी (ता. हातकणंगले) शहराची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी ८२ वर्षांपूर्वी बांधून दिलेल्या दोन विहिरी सर्वांच्याच अक्षम्य दुर्लक्षपणामुळे मोजताहेत शेवटच्या घटका!