शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या दिवशी उमेदवारांची तोबा गर्दी

By admin | Updated: October 14, 2015 01:06 IST

कोल्हापूर महापालिका निवडणूक : ९१५ उमेदवारांचे १५२८ अर्ज दाखल

कोल्हापूर : राज्यात आणि देशात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना पक्षांसह कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, स्थानिक आघाड्यांनी सर्व शक्तीनिशी सहभाग घेतल्यामुळे चुरशीच्या बनलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शहरातील ८१ प्रभागांतून ६०२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आतापर्यंत अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या आता ९१५ इतकी झाली आहे. पदयात्रा, मोटारसायकल रॅलीसह जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात कोणी उमेदवार मागे राहिले नाहीत. त्यामुळे मंगळवारी अवघे शहर निवडणूकमय होऊन गेले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आठव्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया ६ आॅक्टोबरपासून सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार हा अखेरचा दिवस होता. गेले आठ दिवस पितृपक्ष व सर्वपित्री अमावास्येमुळे निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्यास फारसा उत्साह दाखविला नाही; परंतु अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी घटस्थापनेचा मुहूर्त साधत मोठ्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज भरले. त्यामुळे शहरातील सातही क्षेत्रीय कार्यालये नागरिकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेली. सर्वच कार्यालयांत उमेदवारांनी रांगा लावून आपले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. मुदत संपल्यानंतरही प्रक्रिया सुरूउमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली; परंतु त्या वेळेत कार्यालयात आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येत होते. विशेषत: राजारामपुरी जगदाळे हॉल येथे मुदत संपल्यानंतरही अर्ज घेतले जात असल्यावरून कार्यकर्ते आणि निवडणूक अधिकारी यांच्यात वादावादी झाली; परंतु पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना बाहेर काढले. तीन वाजेपर्यंत जे उमेदवार कार्यालयात पोहोचले होते, त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. शेवटच्या दिवशी १००० अर्ज दाखलकोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी शेवटच्या दिवसाअखेर ८१ प्रभागांसाठी एकूण ९१५ उमेदवारांचे १५२८ अर्ज दाखल झाले. त्यामध्ये मंगळवारी ६०२ उमेदवारांनी १००० अर्ज दाखल केले. शक्तिप्रदर्शनामुळे शहर निवडणूकमयशहराच्या बहुसंख्य भागांत अनेक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनाचा डामडौल टाळत मोजक्या कार्यकर्त्यांच्या साथीने नजीकच्या निवडणूक कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मात्र आपले वजन दाखविण्याची संधी या निमित्ताने दवडली नाही. शेकडो कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह झांजपथकांच्या गजरात पदयात्रा, मोटारसायकल रॅली काढत या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले. विविध राजकीय पक्षांचे ध्वज, टोप्या आणि स्कार्फ परिधान केलेल्या कार्यकर्त्यांच्या पदयात्रामुळे निवडणूकमय वातावरण निर्माण झाले होते.