तिघांचे दारू दुकानातील अखेरचे सीसीटीव्ही फुटेज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 11:00 AM2020-12-10T11:00:34+5:302020-12-10T11:03:10+5:30

Crimenews, Cctv, Police, Kolhapurnews वडणगे फाटा येथील बंडगर मळ्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या रिक्षाचालकाच्या खूनप्रकरणी करवीर पोलिसांनी परिसरातील दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज बुधवारी सायंकाळी जप्त केले. या फुटेजमध्ये मृत योगेश शिंदे, दीपक पोवार व सागर चौगुले हे तिघे घटना घडली त्या दिवशी दारू खरेदी करण्यासाठी एकत्रितपणे दुकानात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

The last CCTV footage of the trio's liquor store was seized | तिघांचे दारू दुकानातील अखेरचे सीसीटीव्ही फुटेज जप्त

तिघांचे दारू दुकानातील अखेरचे सीसीटीव्ही फुटेज जप्त

Next
ठळक मुद्देतिघांचे दारू दुकानातील अखेरचे सीसीटीव्ही फुटेज जप्त रिक्षाचालकाच्या खूनप्रकरणी करवीर पोलिसांचा तपास

कोल्हापूर : वडणगे फाटा येथील बंडगर मळ्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या रिक्षाचालकाच्या खूनप्रकरणी करवीर पोलिसांनी परिसरातील दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज बुधवारी सायंकाळी जप्त केले. या फुटेजमध्ये मृत योगेश शिंदे, दीपक पोवार व सागर चौगुले हे तिघे घटना घडली त्या दिवशी दारू खरेदी करण्यासाठी एकत्रितपणे दुकानात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

पैशाच्या देवघेवीच्या व्यवहारातून सोमवारी (दि. ७) योगेश मनोहर शिंदे (वय ३४) याचा दगडांनी ठेचून खून झाला होता. योगेशचा दोघा मित्रांनी दगडांनी ठेचून खून केल्याचे उघडकीस आले आहे.

घटना घडण्यापूर्वी हे तिघे वडणगे मार्गावरील दारूच्या दुकानात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एकत्रित दारू खरेदी करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे खुनाच्या घटनेपूर्वी ते एकत्र असल्याचे दिसून येत आहे. संशयित दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.

Web Title: The last CCTV footage of the trio's liquor store was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.