कुंभी कासारी कारखान्याचे कोविड सेंटर रुग्णांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:23 IST2021-05-23T04:23:47+5:302021-05-23T04:23:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : करवीर तालुक्यातील रुग्णासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नातून कुंभी कासारी कारखान्यावर सुरू केलेल्या ...

Kuvid Kasari factory's Kovid Center supports patients | कुंभी कासारी कारखान्याचे कोविड सेंटर रुग्णांना आधार

कुंभी कासारी कारखान्याचे कोविड सेंटर रुग्णांना आधार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : करवीर तालुक्यातील रुग्णासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नातून कुंभी कासारी कारखान्यावर सुरू केलेल्या कोविड सेंटरचा मोठा लाभ होत आहे. येथे १२० बेडची सुविधा करण्यात आल्याचे उपाध्यक्ष निवास वातकर यांनी सांगितले शनिवारी कोविड केंद्राला उपाध्यक्ष निवास वातकर यांच्या हस्ते औषध व आरोग्य विषयक साहित्याचा पुरवठा करण्यात आला.

यावेळी उपाध्यक्ष म्हणाले या कोविड सेंटरमध्ये १२० बेड असून २० ऑक्सिजन आहेत. १०० रूग्ण येथे उपचार घेत आहेत. करवीर तालुक्यातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. सर्वांनी शासनाने केलेल्या कडक लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.

यावेळी संचालक संजय पाटील, प्रकाश पाटील (कोगेकर) दादासो लाड, जयसिंग पाटील सचिव प्रशांत पाटील, मेडिकल ऑफिसर शशिकांत पाटील ,सुरक्षा अधिकारी बबन पाटील रमेश तळसकर उपस्थित होते.

फोटो

कुंभी कासारी कारखान्यावरील कोविड सेंटरला औषध व आरोग्य साहित्य पुरवठा करताना उपाध्यक्ष निवास वातकर व संचालक प्रकाश पाटील संजय पाटील दादासाहेब लाड जयसिंग पाटील उपस्थित होते.

Web Title: Kuvid Kasari factory's Kovid Center supports patients