चंदुरातील ३१२ सुपरस्प्रेडर नागरिकांची कोविड तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:00+5:302021-05-23T04:24:00+5:30

गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य केले. यांच्या तपासणीचा ...

Kovid investigation of 312 super spreader citizens in Chandura | चंदुरातील ३१२ सुपरस्प्रेडर नागरिकांची कोविड तपासणी

चंदुरातील ३१२ सुपरस्प्रेडर नागरिकांची कोविड तपासणी

गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य केले. यांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गावात समूह संसर्ग झाला आहे किंवा नाही याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानुसार पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत. या तपासणी शिबिरासाठी पं.स. सदस्य महेश पाटील, सरपंच अनिता माने, प्राथमिक आरोग्य केंद्र पट्टणकोडोलीचे वैद्यकीय अधिकारी बोरगावे, समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. समीना हिरोली, वैज्ञानिक अधिकारी रेश्मा शिकलगार , आर. ए. तराळ, आरोग्यसेविका दीपाली कुंभार, तलाठी सीमा धोत्रे, पोलीस पाटील राहुल वाघमोडे, डाटा ऑपरेटर यशवंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच उपकेंद्र चंदूर येथील सर्व आशा या सर्वांचे सहकार्य लाभले.

(फोटो ओळी)

चंदूर येथील मेडिकल, किराणा दुकानदार, पानशॉप, भाजी विक्रेते अशा सुपरस्प्रेडर नागरिकांची कोविड तपासणी करण्यात आली.

Web Title: Kovid investigation of 312 super spreader citizens in Chandura