शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : विद्यापीठाला चांगली श्रेणी मिळेल

By admin | Updated: September 23, 2014 00:46 IST

एन. जे. पवार यांची माहिती : ‘नॅक’ची समिती आज येणार

कोल्हापूर : नॅशनल अ‍ॅक्रिडेशन अ‍ॅण्ड असेसमेंट कौन्सिलच्या (नॅक) तिसऱ्या फेरीतील मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी मिळविण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाने तयारी केली आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या प्रत्येक घटकांनी केलेले प्रयत्न, घेतलेले कष्ट पाहता या मूल्यांकनात चांगली श्रेणी मिळेल. मूल्यांकनासाठी विद्यापीठाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी आज, सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.‘नॅक’ची समिती विद्यापीठात मूल्यांकनासाठी उद्या, मंगळवारपासून येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने केलेल्या तयारीची माहिती देताना कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, या मूल्यांकनात विद्यापीठाचा गेल्या वर्षांतील विविध क्षेत्रांतील कामगिरीचा लेखा-जोखा तपासण्यात येणार आहे. मूल्यांकनाच्या दुसऱ्या फेरीत समितीने शिफारशी, सूचना केल्या होत्या. त्यांची पूर्तता तसेच अभ्यासक्रम-पाठ्यक्रमांतील बदल, शिक्षणपद्धती, संशोधन आणि सल्ला, प्रशासन, विद्यार्थ्यांचा विकास, चांगले उपक्रम राबविणे, नावीन्य या निकषांच्या आधारे मूल्यांकनाची विद्यापीठाने तयारी केली आहे. पाहणीसाठी अधिविभाग, प्रशासनातील विविध विभागांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळची तयारी पाहता आम्हाला ‘अ’ श्रेणी मिळेल, अशी अपेक्षा आहे. पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ‘नॅक’चे समन्वयक डॉ. व्ही. बी. जुगळे, वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही. एन. शिंदे, मास कम्युनिकेशनच्या समन्वयक डॉ. निशा पवार उपस्थित होत्या.तयारी वेगाने...विद्यापीठाचे मूल्यांकन बुधवार (दि. २४) ते शनिवार (दि. २७) या कालावधीत ‘नॅक’ समिती करणार आहे. त्यासाठी सात सदस्यीय समिती उद्या, मंगळवारी कोल्हापुरात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील विविध विभागांमध्ये आज युद्धपातळीवर तयारी सुरू होती. कॅम्पस्मध्ये रंगरंगोटी, विभागांमध्ये स्वच्छता आदी स्वरूपांतील कामे वेगाने सुरू होती. दुपारी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी विविध विभागांच्या प्रमुखांची सिनेट सभागृहात बैठक घेतली. त्यात त्यांनी आपआपल्या विभागांमधील सोयी-सुविधांबाबत, ‘नॅक’ समितीला सामोरे जाण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.