शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाच्या कामाला मुहूर्त लागेना, जमीन संपादन प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने फेरनिविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:48 IST

६ एप्रिलपर्यंत निविदा भरता येणार

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गासाठी लागणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर फेरनिविदा काढण्याची नामुष्की ओढवली. फेरनिविदा ६ एप्रिलपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. या महामार्गाचे भिजत घोंगडे अनेक वर्षे असून त्याला मुहूर्त तरी कधी लागणार? असा प्रश्न नागरिक करत आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

कोल्हापूर ते सांगली हा ३३ किलोमीटरचा महामार्ग असून गेली अनेक वर्षे काम रखडलेले आहे. याबाबत, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही कामाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जमीन संपादन प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण न झाल्याने नव्याने निविदा प्रसिद्ध करावी लागली. 

सांगली ते चोकाक आणि चोकाक ते अंकली फाटा अशा दोन टप्प्यांत रस्त्याचे काम होणार असून त्यासाठी ९३७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकानुसार निविदा १७ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आली आहे. ६ एप्रिलपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत असून ७ एप्रिलला सकाळी साडेअकरा वाजता तांत्रिक बीड ओपन केले जाणार आहे. त्यानंतर फायनान्शियल बीड प्रक्रिया होऊन ठेकेदारांची निवड केली जाणार आहे.

वेगवान प्रवासासाठी प्रतीक्षा

हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी कमी होणार असली तरी प्रत्यक्षात कामाची सुरुवात पावसाळ्यानंतरच होणार आहे. त्यामुळे आणखी काही महिने वेगवान प्रवासासाठी वाहनधारकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur-Sangli Four-Lane Road Faces Delay, Re-Tender Due to Land Acquisition.

Web Summary : Kolhapur-Sangli highway's four-laning is delayed as land acquisition remains incomplete, prompting a re-tender. The 33-km project, promised by Nitin Gadkari, faces further delays. New bids are open until April 6th, with work expected to start after monsoon.