शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे कोल्हापूर पालिकेची निवडणुक पुन्हा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 11:50 IST

Muncipal Corporation Kolhapur-कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून, ती आता नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका लोकनियुक्त सभागृहाची मुदत दि. १५ नोव्हेंबर २०२० रोजी मुदत आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक होईपर्यंत डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याच हाती प्रशासक म्हणून सूत्रे राहणार आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे कोल्हापूर पालिकेची निवडणुक पुन्हा लांबणीवर निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारचा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून, ती आता नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका लोकनियुक्त सभागृहाची मुदत दि. १५ नोव्हेंबर २०२० रोजी मुदत आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक होईपर्यंत डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याच हाती प्रशासक म्हणून सूत्रे राहणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही आक्टोबर २०२०मध्ये होणे अपेक्षित होते. सहा महिने आधीपासून या निवडणुकीची तयारी सुरु होती. परंतु कोरोनाचा संसर्ग राज्यात प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे राज्य सरकारने सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या.

निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे, त्याच टप्प्यावर थांबविण्याचे आदेश दिले. परंतु नोहेंबर-डिसेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे काही अटींवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग निश्चिती आणि प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला. १६ फेब्रुवारीपासून प्रारूप मतदार याद्या तयार करण्याच्या तसेच दि. ३ मार्च रोजी अंतिम मतदार याद्या प्रभाग निहाय तसेच मतदान केंद्रनिहाय जाहीर करण्याचे आदेश दिले.

महानगरपालिका प्रशासन सध्या प्रारूप मतदार याद्यावर आलेल्या सुमारे १८०० हरकती निकालात काढण्याच्या कामात व्यस्त आहे. रात्रंदिवस हे काम सुरू आहे. आणखी दोन दिवसांनी अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तोपर्यंत राज्याच्या अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून, रोज रुग्णसंख्या वाढत आहे.

काही जिल्ह्यात तर दिवसा तर काही जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुसऱ्यांदा मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेत विद्यमान प्रशासकांना ३० एप्रिलपर्यंत मुदत वाढ दिली आहे.

महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकण्याचा तसेच प्रशासकांना मुदतवाढ देण्यासंबंधीच्या विधेयकाच्या मसुद्यास रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात विधेयक सादर करण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्त काळात निवडणुका घेणे शक्य होणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. प्रशासकांना मुदतवाढ देण्याची विनंती आयोगाने केली आहे. त्यामुळे आता प्रशासकांना ही मुदतवाढ दिली जाणार आहे.

बलकवडेच राहणार प्रशासक

महापालिकेच्या आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेल्या कादंबरी बलकवडे यांच्याकडे दि. १६ नोव्हेंबर २०२० पासून प्रशासक म्हणून सहा महिन्यांकरिता कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांची मुदत १५ मेपर्यंत आहे. राज्य सरकार कोरोना संसर्गाचा अंदाज घेऊन ३० एप्रिलपर्यंत निवडणुका घ्यायच्या किंवा नाही याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. तरीही निवडणूक आक्टोबर २०२१पर्यंत घेणे निवडणूक आयोगाला अशक्य आहे.

इच्छुकांच्या उत्साहावर पाणी

निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी केली होती. मतदारांच्या गाठीभेटी, राजकीय पक्षाची उमेदवारी मिळावी याकरिता जोरदार फिल्डिंग लावली होती. छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करून मतदारांशी संपर्क साधला जात होता. काहींनी आपल्या सामाजिक तसेच पालिकेतील कामकाजाची पुस्तिका, हॅन्डबिल वाटण्यास सुरुवात केली होती. परंतु त्यांच्या या उत्साहावर पाणी फिरले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर