शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये कोल्हापुरी थाट; अनुप जत्राटकर, मंगेश गोटुरे, कुणाल लोळसुरे यांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:24 IST

कोल्हापूरच्या अनुप जत्राटकर, मंगेश गोटुरे, कुणाल लोळसुरे यांचा सन्मान

कोल्हापूर : कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला विषय घेऊन याच मातीत इथल्याच कलाकारांनी निर्माण केलेल्या ‘गाभ’ या चित्रपटाला ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार मिळाले. ‘गाभ’साठी कोल्हापूरचा दिग्दर्शक अनुप जत्राटकर आणि निर्माता म्हणून मंगेश गोटुरे या दोघांना तर ‘श्यामची आई’ चित्रपटासाठी कोल्हापूरच्याच कुणाल लोळसुरे याला उत्कृष्ट ध्वनिमुद्रणाचा पुरस्कार मिळाल्याने हे सारे कोल्हापुरी या साेहळ्यात झळकले.‘गाभ’ या चित्रपटाला ‘कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट’ आणि चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ‘कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ असे दोन पुरस्कार मिळाले. वरळी येथे मंगळवारी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात दिग्दर्शक जत्राटकर यांना ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि निर्माते मंगेश गोटुरे यांना कोल्हापूरचेच सुपुत्र आणि प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते या पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय याच सोहळ्यात कोल्हापूरचाच सुपुत्र कुणाल लोळसुरे यालाही ॲड. गुरु भरत दाभोळकर यांच्या हस्ते सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपटासाठी उत्कृष्ट ध्वनिमुद्रणाचा पुरस्कार मिळाल्याने हे सारे कोल्हापुरी या साेहळ्यात झळकले. कुणाल हिंदीत आणि वेब सिरीजसाठी जास्त प्रसिद्ध आहे. परेश मोकाशी, तेजपाल यांच्या मराठी प्रकल्पासह सुजयसोबत केसरीनंतर त्याने साऊंड डिझायनर आणि साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून काम केले आहे. तो भारतीय चित्रपट आणि वेब इंडस्ट्रीत ९ वर्षांपासून सक्रिय आहे.

साऊंड डिझाईनचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बंदिश बँडिट्स, गहराइयां, केसरी, सेक्रेड गेम्स, होस्टेजेस, अफवा, तणाव, जहानाबाद यांसारख्या अनेक गाजलेल्या प्रकल्पांसाठी काम केले आहे. कथा अधिक प्रभावी करण्यासाठी ध्वनीचा कल्पक वापर आणि तंत्रज्ञानाशी हातमिळवणी हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे.