शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर खंडपीठाचा प्रस्ताव महिन्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:27 IST

पाणी कुठेच मुरत नाही, हद्दवाढ करा ना

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचचे पूर्ण खंडपीठ होण्यासाठीचा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडे राज्य सरकारने पाठवला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.कोल्हापुरात एका खासगी कार्यक्रमात खासदार शाहू छत्रपती यांनी सर्किट बेंचचे खंडपीठ कधी होणार, असा सवाल मुख्यमंत्र्यांच्या समोरच उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले.तत्पूर्वी, खासदार शाहू छत्रपती यांनी कोल्हापूर शहरातील रस्ते अन् रखडलेल्या प्रश्नांची यादीच वाचून दाखवली. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा यासह विविध प्रश्न रखडले असल्याचे सांगितले.कोल्हापूर ते मिरज रेल्वेचे दुहेरीकरण, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे, विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देणे या प्रश्नांचा ऊहापोह करत त्यांनी जिल्ह्यातील १८०० विकासकामांची यादीच सर्वपक्षीय लोकांनी माझ्याकडे दिली असून, ही कामे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला निधी जाहीर केला असल्याचे सांगत ज्यांची घरे, जागा यात जाणार आहेत, त्यांनीही या विकासासाठी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्रिपदाची अदलाबदल...मुख्यमंत्र्यांना अमेरिकन कंपनीसोबत गुंतवणुकीचा करार करायचा असल्याने मुंबईला लवकर परतायचे होते. त्यामुळे कार्यक्रमात ते अगोदर बोलले आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतील असे त्यांनीच जाहीर केले. आमच्या दोघांत चांगली अंडरस्टॅण्डिंग असून, मुख्यमंत्री पदातही अदलाबदल केली आहे. त्यांच्याकडे दिलेले पद ते नक्की परत करतात याचा विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगताच हशा पिकला.

पाणी कुठेच मुरत नाही, हद्दवाढ करा नाशाहू छत्रपती यांनी प्रश्नांची यादीच वाचून दाखवल्याचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात कोणत्या प्रकल्पांना किती निधी दिला याची आकडेवारीच सांगितली. खासदार शाहू छत्रपती यांनी केलेल्या मागण्यांबद्दल आम्ही काहीच बोललो नाही तर लोक मग पाणी कुठेतरी मुरते, असे म्हणतात. पाणी कुठेही मुरत नसल्याचे सांगून ते म्हणाले, कोल्हापूरची हद्दवाढ करा, ज्याने-त्याने विरोध करायचे सोडून द्या, कधीतरी त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Bench proposal with Supreme Court, approval expected: Fadnavis

Web Summary : The Kolhapur Circuit Bench full bench proposal is with the Supreme Court. CM Fadnavis expressed confidence in its approval. MP Shahu Chhatrapati raised the issue, highlighting pending development projects and requesting state funding. Deputy CM Pawar announced funds for Ambabai development and urged cooperation for city expansion.