शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

‘केएमटी’चा संप अखेर मागे

By admin | Updated: June 25, 2015 01:07 IST

थकीत पगार भागविण्यासाठी आयुक्त कार्यालयात बैठक

कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांचा मागील दोन महिन्यांचा थकलेला पगार देण्याची तजवीज महापालिका प्रशासनाने केली आहे. महापालिकेत आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. यावेळी येत्या चार दिवसांत दोन टप्प्यांत महापालिकेने एक कोटी रुपये केएमटीला पगारासाठी देण्याचे ठरले. पगाराबाबत तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्रीपासून प्रस्तावित संप मागे घेतल्याचे जाहीर केले. केएमटीच्या कर्मचाऱ्यांचा एप्रिल व मे महिन्यांचा थकीत पगार भागविण्यासाठी आयुक्त कार्यालयात बैठक झाली. बैठकीसाठी परिवहन समितीचे सभापती अजित पोवार, राष्ट्रवादीचे गटनेता राजेश लाटकर, परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, आदी उपस्थित होते. कायम ६५० व रोजंदारीवरील ४४० अशा सर्वच कर्मचाऱ्यांचा एप्रिलचा पगार थकला आहे. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे. कर्मचारी संघटनेने पगारासाठी मध्यरात्रीपासून ‘काम बंद’चा इशारा दिला होता. केएमटीला दरमहा पगारासाठी एक कोटी वीस लाख रुपये लागतात. यातील कपात वजा जाता निव्वळ पगारापोटी ८० लाख रुपयांची गरज असते. एप्रिल महिन्यातील थकीत पगारासाठी केएमटीला २८ लाख रुपये, तर मार्च महिन्याच्या पगारासाठी ८० लाख रुपयांची गरज आहे. महापालिका प्रशासन आता एक कोटी रुपये देणार असून उर्वरित रकमेची जोडणी केएमटी प्रशासन करणार असल्याचे संजय भोसले यांनी सांगितले. इच्छुकांची वारी चुकणार ! ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांची यंदाची पंढरीची वारी चुकणार आहे. वारीच्या कालावधीतच अखंड निवडणुकीचा कार्यक्रम असल्याने त्यांची गोची होणार आहे. मतदानाचा टक्का घटणार जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी ईर्ष्येने उच्चांकी मतदान होते; पण यंदा वारीत निवडणूक आल्याने मतदानाचा टक्का घटणार हे निश्चित आहे. निवडणुका लागलेल्या गावांपैकी बहुतांश गावे ही वारकरी संप्रदायातील असल्याने त्याचा फटका मतदानाला बसू शकतो.