शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

केव्हीज झकास बाकी भकास ..

By admin | Updated: March 11, 2015 00:32 IST

नागाळा पार्क : सेंट झेव्हियर्स स्कूलच्या पाठीमागील रस्त्यांची चाळण; कचरा उठावाची प्रतीक्षा

.कोल्हापूर : शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला भाग म्हणून नागाळा पार्कची ओळख आहे. शासकीय कार्यालये, नामांकित हॉस्पिटल्स् आणि शिक्षणसंस्था या प्रभागामध्ये आहे. या प्रभागात नगरसेविका राहत असलेल्या ‘केव्हीज पार्क’मधील अंतर्गत रस्ते, गटारी, चॅनेल्सची बहुतांशी कामे झाली आहेत पण वारणा कॉलनी परिसर, आरटीओ कार्यालय, सेंट झेव्हियर्सची मागील बाजूच्या परिसरातील रस्त्यांची चाळण झाली झाली आहे. नगरसेविका लीला धुमाळ यांनी पहिल्याच टर्ममध्ये सुमारे पासष्ट लाखांचे रस्ते केल्याचा दावा केला. विवेकानंद कॉलेज ते जिल्हा परिषदेपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. वारणा कॉलनी ते मेरी वेदर ग्राऊंड हा साडेचार लाख रुपयांचा डांबरी रस्ता करण्यात आला आहे. याशिवाय नागेश्वर बंगला ते म्हाडा कॉलनी, एलआयसी कार्यालय ते तक्षक अपार्टमेंट, विवेकानंद कॉलेज ते यश रेसिडेन्सी या डांबरी रस्त्यांची कामे झाली आहेत. केव्हीज पार्क येथे गेल्या पाच वर्षांत २४ लाखांचे रस्ते करण्यात आले आहेत, पण वारणा कॉलनीकडून सेंट झेवियर्सकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. तशीच परिस्थिती विवेकानंद कॉलेज ते वारणा कॉलनी या रस्त्याची आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून मिळालेले दहा लाख रुपये आणि माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांच्या सहकार्यातून मिळालेले पाच लाख रुपये तसेच महानगरपालिकेकडील ९ लाख अशा एकूण पंचवीस लाखांची कामे केव्हीज पार्कमध्ये करण्यात आली आहेत. या निधीतून विशाळगडकर कॉलनीतील गार्डनमध्ये पाच लाख रुपयांचे पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले आहेत, तर उर्वरित रकमेतून अंर्तगत डांबरी रस्ते करण्यात आले आहेत. याशिवाय वक्रतुंड मोटर्स ते नागोबा देवालय, हिंदू कॉलनी, विशाळगडकर कॉलनीत डांबरी रस्ते तयार करण्यात आले आहेत. केव्हीज पार्कमधील ड्रेनेजची बहुतांशी कामे झालेली आहेत. केशर कस्तुरी ते विक्रमसिंह घाटगे यांच्या बंगल्याकडे जाणारे ८ लाख ३३ हजार रुपयांची कामे करण्यात आली आहेत. याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला ते मधुकुंज अपार्टमेंट, विवेकानंद कॉलेज ते वारणा कॉलनी आणि पल्लवी अपार्टमेंट ते विक्रमसिंह घाटगे सरकार बंगला या रस्त्यासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय एस्तर पॅटर्न स्कूलसाठी साडेसहा लाख रुपयांची संरक्षक भिंत, महाराष्ट्र उद्यान येथे २ लाखांची खेळणी, वारणा कॉलनी येथील मैदानासाठी १ लाख वीस हजार रुपयांची खेळणी ही कामे करण्यात आली आहेत.